Author: saimat

 आठ वर्षीय चिमुकलीच्या चेहऱ्यावर भीषण हल्ला साईमत/अमळनेर/प्रतिनिधी  अमळनेर तालुक्यातील पिळोदे गावात बुधवारी पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने दोन लहान मुलांवर केलेल्या हल्ल्याने एकच खळबळ उडाली आहे. या भीषण घटनेत मृणाली दिनेश कोळी (वय ८) ही चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिच्यावर धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सलग दोन हल्ल्यांमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृणाली ही सुट्ट्यांनिमित्त पिळोदे येथे आपल्या मामाच्या घरी आली होती. बुधवार, ४ फेब्रुवारी रोजी दुपारी घराजवळ खेळत असताना अचानक एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर झडप घातली. कुत्र्याने तिच्या गालावर व डोक्यावर अत्यंत क्रूरपणे चावा घेतल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिचा आक्रोश ऐकून आजूबाजूचे नागरिक…

Read More

सावदा शहरात आज पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान भीषण आगीची घटना घडून आली साईमत/सावदा/प्रतिनिधी  सावदा शहरात आज पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान भीषण आगीची घटना घडून आली. विश्वसुद्धा हॉस्पिटलसमोरील परिसरातील पाच दुकाने काही तासांत जळून खाक झाली. प्राथमिक अंदाजानुसार या दुर्घटनेत २५ ते ३० लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच आग उग्र रूप धारण केली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. तत्काळ अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, त्या अगोदरच दुकानदारांच्या फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य, जीवनावश्यक वस्तू आणि इतर मालमत्ता पूर्णपणे जळून…

Read More

अर्धवट जळालेला मृतदेह पाहून परिसरात दहशत साईमत/एरंडोल/प्रतिनिधी  एरंडोल तालुक्यातील पद्मालय गणेश देवस्थानाजवळील जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात दिसून आले आहे की, या घटनेमागे नियोजनबद्ध खून असून, पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जंगलात फेकण्यात आला आहे. घटनास्थळी माहिती मिळाल्याप्रमाणे, पद्मालय ते नागदुली रस्त्यावर असलेल्या जंगलात काही गुराखी त्यांची गुरे चारवायला गेले होते. यावेळी त्यांनी जंगलात एका महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेहाच्या केवळ पायांचे अवशेष स्पष्टपणे दिसत होते, तर उरलेले अवयव अर्धवट जळालेल्या अवस्थेत होते. या घटनेची त्वरित माहिती स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना दिली आणि एरंडोल पोलीस स्टेशनला कळवण्यात आली. घटनास्थळी त्वरित पोलीस पथक दाखल…

Read More

बिजासनी माता मंदिराजवळ मोटरसायकलींचा जोरदार धडक साईमत/ रावेर /प्रतिनिधी रावेर शहराजवळ आज दुपारी झालेल्या भीषण रस्ते अपघातात दोन तरुणांचा अकाल मृत्यू झाला. या घटनेमुळे रावेर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून परिसर शोकाकुल वातावरणात बुडालेला आहे. माहितीप्रमाणे, रावेरजवळील बिजासनी माता मंदिराजवळ विनय भालेराव (वय २६) हा आपल्या मोटरसायकलवरून रावेरच्या दिशेने जात असताना, शुभम लोखंडे (वय २०) रावेरहून विवरकडे येत असताना त्यांच्या मोटरसायकलींचा समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण धडकेत शुभम लोखंडे याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेला विनय भालेराव तातडीने उपचारासाठी भुसावळ येथे हलविण्यात येत होता; मात्र रस्त्यातच त्याने देखील आपले प्राण गमावले. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा…

Read More

 प्रवासी अडकले, गॅस टँकर अपघाताने उपद्रव साईमत/ पुणे /प्रतिनिधी मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी घडलेल्या गॅस टँकर अपघातामुळे तब्बल २२ तास उलटून गेले तरीही वाहतूक सुरळीत झालेली नाही. खंडाळा घाटातील बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली असून, सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. हा अपघात केवळ एक्स्प्रेस वेपुरताच मर्यादित न राहता जुन्या मुंबई–पुणे राष्ट्रीय महामार्गालाही फटका बसला आहे. दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या असून हजारो प्रवासी रात्रीपासून रस्त्यावरच अडकले आहेत. २२ तासांहून अधिक काळ वाहतूक न हलल्याने प्रवाशांचे हाल झाले असून खाणे-पिणे, पाणी आणि शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधांचा तणाव निर्माण झाला आहे. या…

Read More

 मुलीला धमकावून महिलेवर बलात्कार साईमत/पाचोरा  /प्रतिनिधी  पाचोरा तालुक्यातील एका गावात एका २३ वर्षीय विवाहितेवर मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची घटनेने परिसरात खळबळ उडवून दिली आहे. बाळू काळू राठोड या आरोपीवर मंगळवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेच्या मुलीला जबरदस्तीने घेऊन जात धमकी दिली, “मी तुझे बरेवाईट करेन.” या भीतीखाली त्याने महिलेला पाचोरा येथील एका हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केला. पण आरोपी थांबला नाही; पीडितेची बदनामी करण्याची धमकी देत तिला अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव येथील दुसऱ्या हॉटेलवर नेऊन पुन्हा अत्याचार केला. ही घटना ऐकून परिसरात संतापाची लाट उठली असून, नागरिक…

Read More

शेअर मार्केटच्या आमिषात फसवणूक; तरुणीवर विनयभंगाची धक्कादायक घटना भुसावळात साईमत/भुसावळ/प्रतिनिधी  भुसावळ शहरातील एका २७ वर्षीय तरुणीवर सुमारे १० लाख रूपयांची आर्थिक फसवणूक करून, लग्नासाठी दबाव टाकून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ करत आहेत. तक्रारदार तरुणी भुसावळ शहरातील एका भागात आपल्या कुटुंबासह राहते. माहिती मिळाल्याप्रमाणे, संशयित आरोपी सिद्धांक मनोज हेडा (रा. गंगाराम प्लॉट, भुसावळ) यांनी सन २०२० मध्ये तरुणीशी ओळख करून घेतली. त्यानंतर त्याने तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेत, शेअर मार्केटमध्ये फायदा मिळवण्याचे आमिष दाखवून तिला फसवले. आरोपीने तरुणीच्या डी-मॅट अकाउंटची माहिती…

Read More

मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद साईमत/ चाळीसगाव /प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदीच्या पात्रात पाण्यात बुडून एका ४५ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. ४ फेब्रुवारी) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यशवंत फकिरा निकाळजे (वय ४५, रा. संबोधी, ता. धुळे) असे मयत प्रौढाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत निकाळजे हे धुळे जिल्ह्यातील संबोधी गावात कुटुंबासह वास्तव्यास होते. काही कारणास्तव ते चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदी परिसरात आले असताना नदीपात्रात बुडाल्याची घटना घडली. मंगळवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन त्यांना बाहेर काढले. यानंतर यशवंत निकाळजे यांना…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. अजितदादा पवार यांचे अस्थिकलश दर्शन साईमत/अमळनेर /प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. अजितदादा पवार यांचे अस्थिकलश दर्शन व अस्थि विसर्जन कार्यक्रम मंगळवार, ३ फेब्रुवारी रोजी अत्यंत भावनिक वातावरणात पार पडले. दुपारी ३ ते ४ या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, अमळनेर येथे अस्थीकलश दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी नागरिक, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या जीवनकार्याला व योगदानाला श्रद्धांजली अर्पण करताना दिसले. अस्थिकलशानंतर रथयात्रा अमळनेर, धार, मारवड, कळमसरे आणि पाडळसरे मार्गे काढण्यात आली. रथयात्रेदरम्यान मार्गावरील गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करत अखेरचा निरोप दिला. संपूर्ण परिसर शोकाकुल वातावरणात न्हालेला दिसत होता. पाडळसरे धरण येथे…

Read More

“अंडरपास नाही तर रस्ता नाही” अशा घोषणांसह शेतकऱ्यांनी तासनतास महामार्गावर ठिय्या मांडला साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी – मुक्ताईनगर तालुक्यातील लोहारखेडा आणि पिंप्रीभोजना येथील शेतकऱ्यांच्या सहनशीलतेला आज अंतिम काठ आला. प्रलंबित ‘अंडरपास’साठी शेतकऱ्यांनी इंदूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर उग्र रस्ता रोको आंदोलन करत वाहतूक ठप्प केली. “अंडरपास नाही, तर रस्ता नाही” अशा घोषणांसह शेतकऱ्यांनी तासनतास महामार्गावर ठिय्या मांडला, ज्यामुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे कोलमडली. महामार्गावर तासनतास अडथळा सकाळीच मोठ्या संख्येने शेतकरी महामार्गावर जमा झाले. शेतकऱ्यांच्या ठाम आंदोलनामुळे वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवासी, मालवाहतूक व रोजच्या कामासाठी वाहतूक करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले, परंतु शेतकऱ्यांसमोर प्रशासनाचे प्रयत्न निष्फळ ठरले. शेतमाल ने-आण करताना जीव धोक्यात येत असल्याचे…

Read More