Author: saimat team

साईमत अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथे खानदेश साहित्य संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पारंपरिक आखाजी महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. अहिराणी संस्कृतीतील गौराई, झोक्यावरची गाणी, जात्यावरची गाणी यांसारख्या लोकपरंपरांना उजाळा देत या महोत्सवाने संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश दिला. खानदेशातील ही पहिलीच आखाजी महोत्सवाची भव्य आवृत्ती अमळनेरच्या एलआयसी कॉलनीत मोठ्या गर्दीत पार पडली. स्त्रियांच्या कला-कौशल्यांना व्यासपीठ मिळावे आणि जुन्या परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी या महोत्सवाला शासकीय पातळीवर मान्यता मिळावी, तसेच निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. “अहिराणी…

Read More

साईमत वृत्तसेवा आयपीएलच्या भविष्यासंदर्भात इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक ललित मोदी यांनी केलेल्या एका धक्कादायक भविष्यवाणीने क्रिकेट विश्वात मोठी चर्चा निर्माण केली आहे. 2030 पर्यंत आयपीएलमधील एका खेळाडूचा करार 130 ते 150 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असा दावा त्यांनी केला असून या विधानाने क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी तब्बल 1.63 अब्ज अमेरिकन डॉलरला विकली गेली, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ची किंमत 1.78 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली. या प्रचंड आकडेवारीमुळे आयपीएल जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगपैकी एक असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. सध्या आयपीएलमध्ये प्रत्येक संघासाठी खेळाडू खरेदीसाठी 125 कोटी रुपयांचा पर्स निश्चित आहे.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी  आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या वतीने शुक्रवारी जळगाव शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. आमोदा गावातील महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीची झालेली विटंबना या घटनेच्या निषेधार्थ समाजबांधवांनी तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज तीर्थ (शिवतीर्थ मैदान) येथून सुरू झालेला हा मोर्चा जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत काढण्यात आला. मोर्चात समाजातील मोठ्या संख्येने पुरुष, महिला आणि युवक सहभागी झाले होते. हातात फलक, बॅनर घेऊन आणि घोषणाबाजी करत मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. मोर्चाचे मुख्य कारण म्हणजे आमोदा गावात असलेल्या आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या आराध्य दैवत महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याची घटना. या प्रकारामुळे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी  शहरात क्रिकेटचा ज्वर शिगेला पोहोचला असून जळगाव क्रिकेट लीग-२०२६ (JCL T-20) च्या निमित्ताने क्रीडाप्रेमींना रोमांचक क्रिकेटचा अनुभव मिळणार आहे. दि. १८ ते २६ एप्रिलदरम्यान मेहरूण तलाव परिसरातील कांताई नगर येथील जैन ड्रीम स्पेसेस या भव्य क्रीडांगणावर या स्पर्धेचा थरार रंगणार असून, शनिवारी भव्य उद्घाटन सोहळ्याने या लीगची अधिकृत सुरुवात होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विविध मतदारसंघांचे आमदार तसेच जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आणि जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींसाठी हा एक मोठा क्रीडा उत्सव ठरणार आहे. या स्पर्धेत सहा संघ, सहा प्रशिक्षक आणि एकूण १०८ खेळाडू…

Read More

साईमत नाशिक प्रतिनिधी  शहरात अलीकडील काळात उघड झालेल्या विविध गंभीर घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लैंगिक शोषण, फसवणूक तसेच धर्मांतरणाशी संबंधित काही प्रकरणांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज (दि. १८) नाशिकमध्ये उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक विभागीय आयुक्त कार्यालयाजवळील मित्रा संस्थेत पार पडणार असून, शहरातील आयटी कंपन्यांचे प्रमुख, विविध उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी तसेच शासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रमुख अधिकारी यात सहभागी होणार आहेत. महिला सुरक्षेबाबत ठोस धोरण आखणे आणि अंमलबजावणीची दिशा ठरवणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे. गेल्या काही दिवसांत भोंदू बाबा अशोक खरात आणि कथित पत्रकार रवींद्र एरंडे प्रकरणांमुळे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी  जिल्ह्यातील पाण्याच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. जळगाव येथे झालेल्या पाणी आढावा बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरही आपली भूमिका स्पष्ट केली. पाणी परिस्थितीबाबत बोलताना मंत्री पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील जलसाठा आणि पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला असून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील काळात पाण्याचे योग्य नियोजन आणि बचत अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दरम्यान, महिला विधेयकाबाबत बोलताना त्यांनी महिला सक्षमीकरणाचे जोरदार समर्थन केले. “महिला प्रत्येक क्षेत्रात सक्षम आहेत. आज त्या सर्व क्षेत्रांमध्ये उच्च स्थानावर पोहोचल्या…

Read More

साईमत वृत्तसेवा देशातील स्वयंपाकगॅस म्हणजेच एलपीजीच्या किंमतीतील सततचे चढ-उतार आणि पुरवठ्यातील अनिश्चिततेमुळे हॉटेल, रेस्टॉरंट तसेच मोठ्या व्यावसायिक संस्थांचे गणित बिघडत असताना, सरकारकडून एक महत्त्वाचा पर्याय समोर आणला जात आहे. व्यावसायिक स्वयंपाकासाठी एलपीजीऐवजी इथेनॉलचा वापर करण्याबाबत केंद्र सरकार सक्रिय विचार करत असून, या दिशेने एक व्यापक धोरण तयार करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आखाती देशांतील तणाव आणि त्यातून निर्माण झालेल्या जागतिक ऊर्जा संकटाचा परिणाम भारताच्या इंधन पुरवठा व्यवस्थेवरही जाणवत आहे. परिणामी एलपीजीच्या उपलब्धतेवर काही प्रमाणात मर्यादा येत असून, विशेषतः व्यावसायिक क्षेत्रात अडचणी वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारने स्वदेशी आणि टिकाऊ पर्याय शोधण्यावर भर दिला आहे. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, सरकार…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातील तांबापूर परिसर शुक्रवारी संपूर्ण दिवस वीजपुरवठा खंडित झाल्याने अक्षरशः अंधारात बुडाला. सकाळी सुमारे ९ वाजता गेलेली वीज रात्रीपर्यंतही परत न आल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. प्रचंड उकाडा, पाणीटंचाई आणि दैनंदिन कामकाज ठप्प झाल्याने परिसरात तीव्र असंतोष निर्माण झाला. स्थानिक नागरिकांनी वीज विभागाशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र समाधानकारक प्रतिसाद मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काही वेळा फोन उचलला गेला नाही, तर काही वेळा “थोड्याच वेळात वीज येईल” असे सांगून वेळकाढूपणा करण्यात आल्याचा नागरिकांचा दावा आहे. या निष्काळजीपणामुळे संतापाचा उद्रेक झाला. अखेर त्रस्त नागरिकांनी श्यामा फायरजवळ रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन छेडले. अचानक सुरू…

Read More

साईमत नाशिक प्रतिनिधी राज्यात होऊ घातलेल्या जनगणना प्रक्रियेमध्ये अनेक ठिकाणी दिव्यांग कर्मचारी, अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामे दिल्याच्या तक्रारी समोर येत असून, हे शासनाच्या स्पष्ट निर्देशांचे उल्लंघन असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दिनांक २९ सप्टेंबर २०१० रोजी सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार दिव्यांग कर्मचाऱ्यांना जनगणनेची कामे देऊ नयेत, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तरीदेखील प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने संबंधितांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांनी या संदर्भात तीव्र भूमिका घेत शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. दिव्यांग कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण टाकणे अन्यायकारक असून, शासनानेच दिलेल्या आदेशांचे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नगरसेविका जयश्री राहुल पाटील यांनी केली आहे. नॅशनल हायवे प्रकल्प अधिकाऱ्यांना गुरुवार, १६ एप्रिल रोजी निवेदन देत त्यांनी संबंधित ठिकाणी रिफ्लेक्टर व दिशा दर्शक फलक बसविण्याची मागणी केली. निवेदनात नमूद केल्यानुसार, मानराज पार्क स्टॉप ते खोटेनगर दरम्यान असलेल्या पूल व सर्व्हिस रोडच्या कडेला वाहनांची अनियमित पार्किंग होत असल्याने अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच मानराज पार्क स्टॉप ते शिव कॉलनी स्टॉप दरम्यान रेल्वे पुलाजवळही अशीच परिस्थिती निर्माण झाली असून, येथे तातडीने रिफ्लेक्टर आणि दिशा दर्शक फलक बसविण्याची गरज अधोरेखित…

Read More