Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»तांबापूर ९ तास अंधारात; संतप्त नागरिकांचा रस्त्यावर उद्रेक, रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प
    जळगाव

    तांबापूर ९ तास अंधारात; संतप्त नागरिकांचा रस्त्यावर उद्रेक, रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प

    saimat teamBy saimat teamApril 17, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    तांबापूर वीज खंडित रास्ता रोको
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    जळगाव शहरातील तांबापूर परिसर शुक्रवारी संपूर्ण दिवस वीजपुरवठा खंडित झाल्याने अक्षरशः अंधारात बुडाला. सकाळी सुमारे ९ वाजता गेलेली वीज रात्रीपर्यंतही परत न आल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. प्रचंड उकाडा, पाणीटंचाई आणि दैनंदिन कामकाज ठप्प झाल्याने परिसरात तीव्र असंतोष निर्माण झाला.

    स्थानिक नागरिकांनी वीज विभागाशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र समाधानकारक प्रतिसाद मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काही वेळा फोन उचलला गेला नाही, तर काही वेळा “थोड्याच वेळात वीज येईल” असे सांगून वेळकाढूपणा करण्यात आल्याचा नागरिकांचा दावा आहे. या निष्काळजीपणामुळे संतापाचा उद्रेक झाला.

    अखेर त्रस्त नागरिकांनी श्यामा फायरजवळ रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन छेडले. अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

    आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, तातडीने वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. त्यामुळे प्रशासन आणि वीज विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    या आंदोलनात भाजप कार्यकर्ते वसीम बापू, मिलिंद सोनवणे, मुस्तफा खटीक, इमरान पटेल, जुबेर शेख, गोविंद कांबळे, रिजवान बागवान, शाहरुख बागवान आणि अजमल खान यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

    दरम्यान, परिसरातील वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रशासन काय पावले उचलते, यावरच पुढील परिस्थिती अवलंबून आहे.

    Breaking News Marathi electricity problem Jalgaon News power cut jalgaon public protest जळगाव तांबापूर नागरिक आंदोलन महाराष्ट्र बातम्या महावितरण रास्ता रोको वाहतूक ठप्प वीज खंडित स्थानिक बातम्या
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Bhusawal : भुसावळात धावत्या रिक्षाला भीषण आग

    April 17, 2026

    Gulabrao Patil : “पाणी बचतीचा संदेश ते महिला सक्षमीकरणापर्यंत; मंत्री गुलाबराव पाटलांची विविध मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका”

    April 17, 2026

    Jalgaon : उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडित ठेवण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.