साईमत जळगाव प्रतिनिधी शासनाच्या दारात जनतेने फिरू नये, तर सरकारच जनतेच्या दारी जावे या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ हे खऱ्या अर्थाने नागरिकांसाठी दिलासादायक ठरत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू करण्यात आलेले हे शिबिर म्हणजे स्वराज्याच्या विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे जनआंदोलन असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. तरसोद सर्कल अंतर्गत आयोजित या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली, तर जिल्हा परिषद शाळा तरसोद येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रार्थनेने वातावरण भक्तिमय झाले. प्रास्ताविकात महसूल अधिकारी रुपेश ठाकूर यांनी शिबिराचा उद्देश…
Author: saimat team
साईमत प्रतिनिधी समृद्धी महामार्गावर घडलेल्या भीषण अपघातात शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि अशोक खरात यांचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संभाजीनगरहून शिर्डीकडे जात असताना धोत्रे गावाजवळ त्यांच्या कारने उभ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर प्रवास करत असताना शेळके यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कार थेट कंटेनरखाली घुसली आणि वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत शेळके यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…
साईमत चाळीसगाव प्रतिनिधी तालुक्यातील शिवापूर शिवारात भक्षाचा पाठलाग करताना एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन राबवून सुखरूप बाहेर काढले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास भक्षाचा पाठलाग करत असताना हा बिबट्या थेट शेतातील विहिरीत कोसळला. विहिरीत पडल्यावर त्याने पाण्यातील पाईपला आधार घेत स्वतःचा जीव वाचवत बराच वेळ तरंगत राहिल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर शिवापूर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जळगाव जिल्ह्यात काही भागात बिबट्यांचा वावर वाढत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक शेतकऱ्यांनी तातडीने वनविभाग आणि पोलिसांना…
साईमत प्रतिनिधी भारत आणि ऑस्ट्रिया यांनी संरक्षण तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवत द्विपक्षीय संबंधांना नव्या धोरणात्मक स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वपूर्ण शिखर परिषदेत दोन्ही देशांनी भविष्यातील नवोन्मेष आणि जागतिक स्थिरतेसाठी एकत्र काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. उच्चस्तरीय शिखर परिषद या बैठकीचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रियाचे फेडरल चान्सलर डॉ. ख्रिश्चन स्टॉकर यांनी केले. विशेष म्हणजे, चान्सलर स्टॉकर यांनी युरोपबाहेरील त्यांच्या पहिल्या अधिकृत दौऱ्यासाठी भारताची निवड केली, ज्यातून भारत-ऑस्ट्रिया संबंधांचे वाढते महत्त्व अधोरेखित झाले. या शिष्टमंडळात परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा…
साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या जळगाव जिल्ह्यातील संघटनात्मक रचनेत महत्त्वाचा बदल करण्यात आला असून नंदू आप्पा पाटील यांची जिल्हाप्रमुखपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात पक्षाच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा आणि गती मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ संभाजी शिंदे यांच्या आदेशानुसार, तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वपूर्ण जबाबदारी नंदू आप्पा पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी भोर यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्तीनंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.नंदू आप्पा पाटील हे जळगाव…
साईमत जळगाव प्रतिनिधी राज्यातील माथाडी कामगारांच्या आरोग्याचा विचार करून राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या गोण्यांचे वजन कमाल ५० किलोपर्यंतच मर्यादित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे हजारो माथाडी कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. जड गोण्यांमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम कांदा, बटाटा तसेच इतर शेतमालाच्या जड गोण्या उचलताना माथाडी कामगारांच्या शरीरावर मोठा ताण येत होता. दररोज ५० किलोपेक्षा जास्त वजन उचलावे लागत असल्याने पाठदुखी, सांधेदुखी आणि इतर गंभीर आरोग्य समस्या वाढत होत्या. वयोमानानुसार हा त्रास अधिक तीव्र होत असल्याने वजन मर्यादा घालण्याची मागणी सातत्याने केली जात होती. आंतरराष्ट्रीय मानकांचा आधार या निर्णयासाठी आंतरराष्ट्रीय…
साईमत भडगाव प्रतिनिधी टिटवी येथील प्राथमिक आश्रम शाळेत १४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळ्या आणि सामाजिक भान जपणाऱ्या उपक्रमातून अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देत हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक निलेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आढावा देत शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय या त्यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. प्रमुख अतिथी शरद देवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी डॉ. आंबेडकर यांनी समाज उभारणीसाठी…
साईमत प्रतिनिधी राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून भारतीय हवामान विभागाने (IMD) संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. आगामी चार दिवस राज्यासाठी ‘धोक्याचे’ ठरणार असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वाढत्या तापमानामुळे प्रशासनाने नागरिकांना “गरज असेल तरच घराबाहेर पडा,” असे कळकळीचे आवाहन केले आहे. विदर्भ-मराठवाड्यात पारा ४४ अंशांच्या पार हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्याच्या काही भागांत तापमानाचा पारा ४० ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याला या उष्णतेचा मोठा फटका बसणार आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर तापमान जास्त नसले तरी, हवामानातील दमटपणामुळे (Humidity)…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरात भरदिवसा इक्वीटस स्मॉल बँकेचे ATM मशीन चोरून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील ही अट्टल गुन्हेगारांची टोळी असून, त्यांनी महाराष्ट्र आणि झारखंडसह देशभरात चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. नेमकी घटना काय? दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी जळगाव शहरातील सत्यम प्लाझा कॉम्पलेक्समधील इक्वीटस स्मॉल बँकेचे अख्खे ATM मशीन अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. याप्रकरणी बँक मॅनेजर हरीष विजय गांधी यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशी झाली अटक पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक…
साईमत धुळे प्रतिनिधी शहराजवळील एका गावात अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी घटना समोर आली असून गर्भपातासाठी घेतलेल्या गोळ्यांचे अतिसेवन झाल्याने १८ वर्षीय अविवाहित तरुणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीची अचानक तब्येत बिघडल्याने तिला देवपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक तपासणीत डॉक्टरांना ती सुमारे २४ आठवड्यांची म्हणजेच सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. गरोदरपणा लपवण्यासाठी किंवा गर्भपात करण्याच्या उद्देशाने तिने काही औषधांचे सेवन केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. औषधांचे अतिसेवन झाल्यामुळे तिचा रक्तदाब झपाट्याने कमी झाला आणि तिला झटके येऊ लागले. प्रकृती अधिक गंभीर झाल्याने डॉक्टरांनी तिला तातडीने…