वरणगाव फॅक्टरीच्या सुरक्षा रक्षकाचा पुराच्या पाण्यात मृत्यू

0
2

साईमत, वरणगाव : प्रतिनिधी

आयुध निर्माणीमधील सुरक्षा रक्षक सकाळी आपल्या दुचाकीने कर्तव्यावर जात असतांना वाटेवरील नाल्यातील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सविस्तर असे की, वरणगाव फॅक्टरीचे सुरक्षा रक्षक (दरबान) शुभम बबलू तायडे (वय २३, रा. भुसावळ) हे नेहमीप्रमाणे वरणगावमार्गे फॅक्टरी येथे सकाळी सात वाजेदरम्यान आपल्या कर्तृत्वावर जात होते. मात्र, रविवारी सकाळपर्यंत सुरु असलेल्या पावसामुळे या मार्गावरील लवकीच्या नाल्याला पूर आला असल्याचा अंदाज त्यांना आला नाही. त्यामुळे त्यांनी नाल्यावर असलेल्या लहानशा पुलावरुन आपली दुचाकी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नाल्यातील अचानक आलेल्या पुराच्या प्रवाहाने त्यांची दुचाकी घसरून ते पाण्यात वाहुन गेल्याची घटना त्यांची पुलालगत पडून असलेल्या दुचाकीवरून उघडकीस आली.

काटेरी झुडपात अडकला मृतदेह

घटनेबाबत माहिती मिळताच सपोनि आशिषकुमार तसेच आयुध निर्माणीचे कर्मचारी महेश पाटील, रवींद्र सपकाळे व सहकाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. तेव्हा अवघ्या काही अंतरावर त्यांचा मृतदेह काटेरी झुडपात अडकलेला आढळून आला. याबाबत आयुध निर्माणीचे कर्मचारी महेश पाटील यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात घटनेबाबत दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मयत शुभम तायडे यांच्यावर भुसावळ येथील स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here