वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल
साईमत/ न्यूज नेटवर्क/ वरणगाव :
भर वेगात येणाऱ्या दुचाकीस्वाराने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने वरणगावातील युवकाचा मृत्यू झाला. घटनेत दोन जण जखमी झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास महामार्गावरील कपील वास्तु नगर समोर घडली. याबाबत वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
दादाराव नारायण जमदाडे (वय ३६, रा. वामन नगर, वरणगाव) त्याची दुचाकी (क्र.एम. एच. १९ ए. एच. ४७३९) वरुन दीपनगर येथील कामावरुन घरी येत असतांना त्यास समोरुन भरवेगात हिरो होंडा शाईन कंपनीच्या दुचाकी (क्र.एम.एच. १९ डी. ए. ७९२६) वरील चालक साजीद अहमद पूर्ण नाव माहित नाही. त्याने धडक दिल्याने दादाराव नारायण जमदाडे यांचे डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. साजीद अहमद स्वत : व त्याच्यासोबत असलेला एक साथीदार जख्मी झाला. दुखापतीस कारणीभूत झाला.
याप्रकरणी सुर्यभान भिवराव जमदाडे (रा.मन्यारखेडा, ता. भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक गणेश देशमुख, एएसआय मनोहर पाटील, प्रमोद कंखरे करीत आहे.