फैजपुरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव

0
2

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी

नैसर्गिक मानवाधिकार संरक्षण परिषद फोरम संस्थेद्वारे आयोजित जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळा जळगाव येथील जिल्हा नियोजन समिती भवन येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. सुरेश मामा भोळे, तहसीलदार पंकज लोखंडे, गोरख देवरे ( नॅशनल डायरेक्टर, NHRPCF), श्री.शिंपी (चोपडा, कृषी अधिकारी), डॉ. भास्कर दिपके ( महा. समन्वय), प्रकाश पाटील (महा. निरीक्षक), प्रफुल्ल पाटील ( उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष), डॉ. शरीफ बागवान (जिल्हाध्यक्ष), ईश्वर पाटील (महा. सरचिटणीस) आदी मान्यवर उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील नैसर्गिक मानवाधिकार संरक्षण परिषद फोरमतर्फे समाजातील विविध सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, कृषी, उद्योग, व्यवसाय आदी क्षेत्रातील बहुमूल्य योगदान दिलेल्या मान्यवरांचा जळगाव जिल्ह्यातील विविध भागातील लोकांचा आदर्श शेतकरी, कृषी रत्न, समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुरस्कार्थींमध्ये यांचा आहे समावेश

फैजपूर शहरातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यात महेश वाघोदेकर (कला क्षेत्र, समाज भूषण), डॉ. दानिश शेख (वैद्यकीय क्षेत्र, समाज भूषण), भरत भंगाळे ( कृषी क्षेत्र, कृषी रत्न), योगेश चौधरी ( दिव्यांग हस्त कला क्षेत्र, समाज भूषण), शरीफ मलक ( शिक्षण क्षेत्र, समाज भूषण), संजय सराफ (पत्रकारीता क्षेत्र, समाज भूषण), संजय रल ( समाजसेवक, समाज भूषण), दिलीप कोळी ( समाज भूषण), जगदीश धांडे ( व्यवसाय क्षेत्र, समाज भूषण), प्रतिक वारके ( शेतकरी, कृषी रत्न), भारत चौधरी (सामाजिक क्षेत्र, समाज भूषण), श्रीमती. पुष्पा फेगडे ( अंगणवाडी सेविका, समाज भूषण), सीमा कोल्हे (अंगणवाडी सेविका, समाज भूषण) या सर्वांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here