बोदवड महाविद्यालयात डॉ. मधुकर खराटे यांचा सत्कार

0
3

साईमत, बोदवड : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी मुंबईद्वारा आचार्य नंददुलारे वाजपेयी समीक्षा पुरस्काराने महाविद्यालयाचे माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ.मधुकर खराटे यांना सन्मानित केल्याबद्दल बोदवड एज्युकेशन सोसायटी व कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय हिंदी विभागातर्फे सत्कार नुकताच सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी ॲड. प्रकाशचंद सुराणा होते. यावेळी संस्थेचे संचालक श्रीराम बडगुजर, विजयकुमार कोटेचा, अशोक जैन, आनंद जैस्वाल, रवींद्र माटे, कैलास खंडेलवाल, मंजुलता सुराणा आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष मिठूलाल अग्रवाल यांनी डॉ.खराटे यांचे कौतुक केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव विकास कोटेचा यांनी डॉ. खराटे यांचे हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे. तसेच हिंदी जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर बोलली जाते, असे मनोगतातून सांगितले. सत्कारमूर्ती डॉ.मधुकर खराटे यांनी मनोगतातून हिंदी भाषेचे महत्व विविध उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी मुंबईद्वारा ‘हिंदी उपन्यासों में किन्नर विमर्श’ या ग्रंथासाठी आचार्य नंददुलारे वाजपेयी समीक्षा पुरस्काराची रक्कम ५१ हजार संस्थेस विकासासाठी प्रदान केली.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी उपप्राचार्य विनोद चौधरी, बाबुराव हिवराळे, डॉ.मनोज निकाळजे, डॉ.रत्ना जवरास, डॉ.अजय पाटील, डॉ. रूपाली तायडे, कंचन दमाडे, डॉ.गीता पाटील, अनिल धनगर, डॉ.वंदना नंदवे, हेमलता कोटेचा, शरद पाटील, अजित पाटील, योगेश राजपूत, राजू मोपारी, जितेंद्र बडगुजर, अतुल पाटील, डॉ.रूपेश मोरे यांनी परिश्रम घेतले. सत्कारमूर्तींचा परिचय हिंदी विभाग प्रमुख प्रा.वैशाली संसारे यांनी करून दिला. प्रास्ताविक प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी, सूत्रसंचालन डॉ. अमर वाघमोडे तर प्रा.धीरेंद्र कुमार यादव यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here