स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मराठा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

0
2

साईमत, सोयगाव : प्रतिनिधी

आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय मूलभूत सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी सोमवारी, १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमात २५० आदिवासी विद्यार्थ्यांना निंबायती येथे मोफत दप्तराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. मराठा प्रतिष्ठान आणि अशोक गोयल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने निंबायती गाव येथे हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी तहसीलदार मोहनलाल हरणे, पोलीस निरीक्षक अनमोल केदार, मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान गव्हांडे, जिल्हाध्यक्ष विजय काळे, माजी सभापती चंद्रकांत पाटील, आदिवासी तडवी भिल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अलीबाबा तडवी आदी उपस्थित होते.

उपक्रमात निंबायती येथील प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवीच्या २५० विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वितरण करण्यात आले. यावेळी तहसीलदार हरणे, पोलीस निरीक्षक अनमोल केदार, सोपान गव्हांडे, अलीबाबा तडवी आदींनी मनोगत व्यक्त केले.

आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास धरावी

या सामाजिक उपक्रमातून सामाजिक एकता निर्माण व्हावी, असे मत पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी व्यक्त केले. आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास धरावी, मोठे व्हावे, असे तहसीलदार हरणे यांनी सांगितले. सोपान गव्हांडे यांनी सामाजिक हेतू बाळगून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनुप तडवी, करीम तडवी आदींनी ग्रामस्थांच्यावतीने मान्यवरांचा सत्कार केला. यशस्वीतेसाठी सरपंच गणेश माळी, सोनु तडवी, समाधान घुले, प्रमोद वाघ, नाब्बास तडवी, जबीर तडवी, ज्ञानेश्वर युवरे, विनोद पाटील, सुधाकर पाटील, ज्ञानेश्वर गवळी, दिनेश पाटील, गणेश तायडे, प्रशांत पाटील, करीम तडवी, सिराज तडवी, शोएब तडवी, सुभेखा तडवी, जुबेर तडवी, शबानूर तडवी, राईस तडवी आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष विजय चौधरी तर गणेश माळी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here