साईमत, अमळनेर : प्रतिनिधी पुणे येथील महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्थेतर्फे अखिल भारतीय राजभाषा हिंदी विभूषण, हिंदी विशारद, हिंदी रत्न परीक्षा देवगाव येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथे घेण्यात आली. देवगाव देवळी येथील महात्मा फुले स्कूलमध्ये आठवी, नववी व दहावीचे ६७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षा शांततापूर्ण वातावरणामध्ये घेण्यात आली. महात्मा फुले स्कूल येथे हिंदी राष्ट्रभाषा यांच्यामार्फत परीक्षेला गेल्या बारा वर्षापासून विद्यार्थ्यांना बसविण्यात येत होते. या वर्षापासून महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था, पुणे यांच्यामार्फत परीक्षेला बसविण्यात आले आहे. परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक बक्षिसे व सन्मानपत्र महात्मा गांधी राजभाषा प्रचार संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.…
Author: Sharad Bhalerao
साईमत, जामनेर : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, विद्यार्थ्यांची गळती थांबावी, या हेतूने राज्यात केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्य शासनामार्फत शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येत आहे. त्याद्वारे राज्यातील कोट्यवधी मुलांची शाळेतच आहाराची सोय झाली होती. मात्र, पहूर येथील संतोषीमाता नगर जिल्हा परिषद शाळेमध्ये २१ जुलै २०२३ पासून शालेय पोषण आहार पूर्णपणे बंदावस्थेत आहे. जुलै महिन्यापासून आहार न मिळाल्याने आर्थिक स्थिती बिकट असलेल्या कुटुंबातील मुलांची मोठी आबाळ झाली आहे. त्यामुळे कुपोषणाचेही प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व विद्यार्थ्यांना लवकर पोषण आहाराचा पुरवठा न केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जन आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे ‘गाव तिथे जनजागृती’ अभियान सोमवारी, १४ ऑगस्टपासून सुरू करण्यात आले. त्यामध्ये विविध आजारांबद्दल मार्गदर्शन आणि साथीच्या रोगांच्याबाबतीत जनजागृती करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा हिवताप कार्यालयाचे प्रमुख जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.देवराम लांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेश पाटील, डॉ.कोमल देसले यांनी मार्गदर्शन करुन सूचना दिल्या. गावामध्ये जाऊन कर्मचाऱ्यांनी कंटेनर सर्वेक्षण जलद ताप सर्वेक्षण आणि रक्ताचे नमुने घेतले. तसेच शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना विविधि आजारांबद्दल आरोग्य सेवक रवींद्र सूर्यवंशी यांनी माहिती दिली. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांना अभियान राबविले…
साईमत, कासोदा, ता.एरंडोल : वार्ताहर पाचोरा येथील साप्ताहिक झुंज व ध्येय न्यूज युट्युब तथा वेब न्यूज चॅनलचे संपादक संदीप दामोदर महाजन यांना स्थानिक आ.किशोर पाटील यांच्याकडून झालेल्या असंविधानिक व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून पत्रकाराला दिलेल्या धमकीबद्दल, त्यांच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीबाबत निवेदनाद्वारे तीव्र शब्दात निषेध नोंदविला. यासंदर्भात कासोदा परिसरातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे स्थानिक पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. संदीप महाजन यांनी ईमेलद्वारे केलेल्या तक्रारीची दखल घेऊन त्यांची तक्रार नोंद व्हावी, संदीप महाजन व त्यांच्या कुटुंबीयांच्या सदस्यांच्या जीवितास धोका आहे. त्यांना विनामूल्य पोलीस संरक्षण मिळावे. तसेच पत्रकार संदीप महाजन यांच्या बदनामी आणि मारहाणीमुळे त्यांचे कुटुंबीय भयभीत झाले आहे. १५ ऑगस्ट रोजी…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील गजानन महाराज मंदिर, पुनगाव रोड येथे नाभिक समाजाची सर्वसाधारण सभा, विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. कोरमअभावी सभा तहकूब करून काही वेळानंतर तेथेच सभा घेण्यात आली. तसेच समाजातील मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्षस्थानी ॲड. शांतीलाल सैंदाणे होते. सभेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. समाजाचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी त्यांच्या कार्यकारिणीत नवीन सदस्यांची निवड केली. त्यात प्रामुख्याने अनिल श्रावण अहिरे, योगराज काशिनाथ सोनवणे, सुखदेव संतोष वाघ, गुलाब बारकू ठाकरे, कृष्णराव अर्जुन वाघ, कैलास भास्कर अहीरे, विकास अशोक पगारे, जगन्नाथ बारकू सोनवणे, मांगो वना राऊत, शरद गजानन अहिरे, सुनील श्रावण अहिरे, शोभा रमेश जाधव यांची निवड…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी क्रांती दिन ९ ऑगस्ट ते स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमाअंतर्गत जामनेर शहरात ‘हर घर तिरंगा’ अभियानाची सुरवात करण्यात आली. यावेळी शहरातील सर्वात उंच व भव्य तिरंगा ध्वजाचे पूजन माजी सैनिक किशोर पाटील यांच्या हस्ते करून ध्वजारोहण करण्यात आले. तसेच पंचप्राण शपथ घेऊन स्वातंत्र्य सैनिक यांचे नाव कोरलेल्या शिल्पाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी जामनेर शहराच्या नगराध्यक्षा साधना महाजन, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, जामनेर नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्यासह सर्व नगरसेवक, न.प.चे सर्व अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील एसएसएमएम महाविद्यालयात विद्यार्थी विकास व एनएसएस विभागाच्यावतीने ‘मेरी माटी मेरा देश’ या शासनाच्या कार्यक्रमाअंतर्गत १०० वृक्ष लावून पर्यावरण संवर्धनाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. दरवर्षी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करून पर्यावरण संवर्धनाची जागृती करण्यात येते. वृक्षारोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन संजय वाघ, मानद सचिव महेश देशमुख, व्हा.चेअरमन व्ही.टी.जोशी, संचालक राका देवरे, डॉ.जयंत पाटील, डॉ.पितांबर पाटील, योगेश पाटील, भोलाआप्पा चौधरी, प्राचार्य डॉ.शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ.जे.व्ही.पाटील, उपप्राचार्य प्रा.जी.बी.पाटील, प्रा.राजेश मांडोळे, प्रा.एस. एस. पाटील, डॉ.एस.बी.तडवी प्रा.पी.एम.डोंगरे, डॉ.माणिक पाटील, प्रा.राजेश वळवी, प्रा.महेंद्र महाजन, प्रा.वाय.बी.पुरी, डॉ.शरद पाटील, प्रा.स्वप्नील भोसले, नितीन पाटील, ऋषिकेश ठाकूर,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी नव्या पिढीसाठी देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास पुन्हा एकदा चित्रप्रदर्शनातून मांडण्यात आला आहे. विद्यार्थी, पालकांनी या चित्रप्रदर्शनाला भेट देऊन देशाचा इतिहास समजून घ्यावा. जो इतिहास समजून घेईल, तो इतिहास निर्माण करू शकतो. या विचाराने जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, संघटना प्रतिष्ठान यांनी चित्रप्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन खा.उन्मेश पाटील यांनी केले. चाळीसगाव बस स्थानकात सोमवारी, १४ ऑगस्ट रोजी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय- जळगाव यांच्या विद्यमाने मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे आयोजन केले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन खा.उन्मेश पाटील यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय संचार ब्यूरो प्रबंधक संतोष देशमुख, पंचायत…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील बापु चौधरी यांनी भारतीय सैन्य दलात वीस वर्षे देशाची सेवा बजावली. त्यात त्यांनी काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, पुणे अश्ाा ठिकाणी देशाची सेवा केली. ते दोघे भाऊ सैन्यात आहे. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर रेल्वे स्थानकापासून माजी सैनिक त्रिदल सेना उत्तर महाराष्ट्र आबासाहेब गरुड यांच्या टीमने मिरवणूक गाजत वाजत काढली. मिरवणुकीत देशसेवेचे गाणे वाजविण्यात आले. यावेळी विकास देवरे, गोविंद वाघ, नितीन परदेशी, वाल्मिक बागुल, समाधान राठोड, गुलाब पाटील, विजय पाटील, मनोज महाडिक यांच्यासह माजी सैनिक उपस्थित होते.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील निसर्गटेकडीजवळ समाधान मोरे यांची शेती आहे. शेतातील विहिरीत गेली पाच दिवसापासून विषारी जातीचा नाग पडलेला होता. शेतकऱ्याने त्याची माहिती ब्राम्हणशेवगे येथील सर्पमित्र गौरव नेरकर यांना दिली. अथक परिश्रमानंतर नाग विहिरीतून बाहेर काढण्यात येऊन नैसर्गिक आदिवासात सोडून ‘जीवदान’ दिले. यावेळी परिसरातील शेतकरी वर्ग उपस्थित होते. याबद्दल गौरव नेरकरचे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहे.