पत्रकारावरील हल्ल्याचा नोंदविला निषेध

0
1

साईमत, कासोदा, ता.एरंडोल : वार्ताहर

पाचोरा येथील साप्ताहिक झुंज व ध्येय न्यूज युट्युब तथा वेब न्यूज चॅनलचे संपादक संदीप दामोदर महाजन यांना स्थानिक आ.किशोर पाटील यांच्याकडून झालेल्या असंविधानिक व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून पत्रकाराला दिलेल्या धमकीबद्दल, त्यांच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीबाबत निवेदनाद्वारे तीव्र शब्दात निषेध नोंदविला. यासंदर्भात कासोदा परिसरातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे स्थानिक पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.

संदीप महाजन यांनी ईमेलद्वारे केलेल्या तक्रारीची दखल घेऊन त्यांची तक्रार नोंद व्हावी, संदीप महाजन व त्यांच्या कुटुंबीयांच्या सदस्यांच्या जीवितास धोका आहे. त्यांना विनामूल्य पोलीस संरक्षण मिळावे. तसेच पत्रकार संदीप महाजन यांच्या बदनामी आणि मारहाणीमुळे त्यांचे कुटुंबीय भयभीत झाले आहे. १५ ऑगस्ट रोजी आत्महत्या करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. असे काही झाल्यास यावर सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असणार आत्महत्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार बांधवांनी केली आहे.

निवेदनावर उत्तम महाजन, जितेंद्र ठाकरे, केदार सोमाणी, राहुल मराठे, शालिग्राम पाटील, सागर शेलार, गणेश मोरे, शैलेश पुरोहित, प्रशांत सोनार, आरिफ पेंटर, नुरोद्दीन मुल्लाजी, फयाजोद्दीन शेख, सुनील पाटील, इम्रान शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here