जामनेरला न.पा.तर्फे राबविले ‘हर घर तिरंगा’ अभियान

0
3

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

क्रांती दिन ९ ऑगस्ट ते स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमाअंतर्गत जामनेर शहरात ‘हर घर तिरंगा’ अभियानाची सुरवात करण्यात आली. यावेळी शहरातील सर्वात उंच व भव्य तिरंगा ध्वजाचे पूजन माजी सैनिक किशोर पाटील यांच्या हस्ते करून ध्वजारोहण करण्यात आले. तसेच पंचप्राण शपथ घेऊन स्वातंत्र्य सैनिक यांचे नाव कोरलेल्या शिल्पाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी जामनेर शहराच्या नगराध्यक्षा साधना महाजन, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, जामनेर नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्यासह सर्व नगरसेवक, न.प.चे सर्व अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here