Author: Sharad Bhalerao

साईमत, जळगाव : प्रतिनिधी खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचालित कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या समारोपनिमित्त भारतीय वायुसेनेचे सेवानिवृत्त अधिकारी दिनकर सोनवणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका सीमा वैजापूरकर, पर्यवेक्षक एस.पी.निकम आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन वृक्ष लागवड आणि वृक्ष संगोपन करण्याचे आवाहन श्री. सोनवणे यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या रॅलीला दिनकर सोनवणे यांनी झेंडा दाखविला. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी शहरातील श्री सरस्वती प्रसारक मंडळ संचलित पी. के.कोटेचा महिला महाविद्यालयात खोट्या ठरावांसह दाखल्यांद्वारे दोन शिक्षण सेवकांची बेकायदा भरती करून शासनाची तब्बल १७ लाख २ हजार ६३० रूपयांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तक्रार अर्जावरून संस्थाध्यक्षा, प्राचार्य, दोन शिक्षण सेवकांसह सहा जणांविरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळ संचलित पी. के.कोटेचा महिला महाविद्यालयात महेश चौधरी व रुकसाना बी.ताज्जुमल यांना २०१४ ते २०१७ या काळात संस्थेत शिक्षण सेवक म्हणून कागदोपत्री रूजू करून घेण्यात आले. तसेच त्याबाबत खोटा ठराव व खोटे दाखले तयार करण्यात आले. याबाबत…

Read More

साईमत, सावदा, ता. रावेर : वार्ताहर आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करून फरार झालेला संशयित आरोपी तथा शाळा समितीचा चेअरमन अक्रम खान अमानुल्ला खान याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. दुसरीकडे मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांनाही तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे. सविस्तर असे की, सावदा येथील एका शाळेतील विद्यार्थिनीचा शाळेच्या चेअरमननेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी सावदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शालेय समितीचे चेअरमन अक्रम खान अमानुल्ला खान या प्रमुख संशयितासह मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांच्या विरोधात ७ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून हे सर्व जण पोलिसांच्या हातावर…

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील हॉटेल राजवाडामध्ये रविवारी, १३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजून २५ मिनीटांनी भुसावळ तालुका पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. कारवाईत हॉटेलचे मालक व व्यवस्थापकांकडून परप्रांतीय तीन तरूणींची सुटका करुन त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, देहविक्री करणाऱ्या तिन्ही परप्रांतीय तरुणींची सुटका करुन त्यांना महिला सुधारगृहात हलविण्यात आले आहे. सविस्तर असे की, भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील राजवाडा हॉटेल व लॉजिंगवर तालुका पोलिसांनी छापा टाकला. कारवाईत हॉटेल मॅनेजर पंडीत टोंगळे (रा. कुऱ्हे पानाचे) व मालक संभाजी एकनाथ पाटील (रा. जामनेर)…

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी विनापरवाना गावठी बनावटीचा कट्टा आणि जिवंत काडतूस घेऊन भुसावळ शहरातील यावल नाका येथे दहशत निर्माण करणाऱ्या संशयित आरोपीला भुसावळ शहर पोलिसांनी शनिवारी, १२ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता अटक केली. त्याच्यावर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रोहित सुनील सपकाळे (वय २१, रा. अंजाळे, ता. यावल) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सविस्तर असे की, शहरातील यावल नाका परिसरात रोहित सपकाळे हा तरुण दुचाकीवर येऊन हातात गावठी बनावटीचा कट्ट्याचा धाक दाखवत दहशत माजवित असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. शनिवारी, १२ ऑगस्ट…

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी शहरात बेकायदेशीर रित्या गांजाचा नशा करणाऱ्या आठ जणांवर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यात रेल्वेस्थानक परिसरात तीन जणांवर तर शिवदत्त नगरातील सरकारी दवाखान्याजवळ पाच जणांवर कारवाई करून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात आणि शिवदत्त नगरातील सरकारी दवाखान्याचा परिसरात काही तरुण हे बेकायदेशीररित्या गांजाच्या नशा करत असल्याची माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या शनिवारी, १२ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा नऊ वाजता बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पथकाने कारवाई केली. त्यात संशयित आरोपी प्रकाश दीपक बाबर (वय २०,…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव यांच्याकडून सोमवारी, १४ रोजी दुपारच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय बातमीवरून यावल ते किनगाव रस्त्याने गस्त करीत असताना चुंचाळे गावाजवळ संशयित वाहनाचा (क्र.एमएच २८ बी ८५४३) अटकाव करून वाहनाची तपासणी केली. तेव्हा त्यात अवैध विनापरवाना लाकूड तसेच यावल ते हरिपुरा रस्त्याने गस्त करीत असताना वाहन (क्र. एचआर- ४७ बी ०६७२) वाहनात अवैध लाकूड भरलेले दिसले. वाहन चालकाकडे लाकूड वाहतूक परवाना मिळून आला नाही. प्रथमदर्शनी वन गुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्याने मुद्देमालासह वाहन पुढील चौकशीसाठी ताब्यात घेऊन यावल येथे शासकीय आगारात आणून ताबा पावतीने जमा केले आहे. वनविभागाने कारवाईत ट्रकसह सव्वा बारा लाखांचा सागवान जप्त केला…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी शहरातील एका भागात अल्पवयीन मुलीवर तीन वेळा अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलाीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, पाचोरा शहरातील एका भागात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तिच्या घराच्या परिसरात राहणारा तुषार वसंत गायकवाड याने पीडित मुलीवर तीन वेळा अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित मुलगी ही गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली. त्यानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित मुलीसह तिच्या आईने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी रविवारी, १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता पाचोरा…

Read More

साईमत, बोदवड : प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सेवा फाउंडेशनकडून अभिवादन करण्यात आले. तसेच बोदवड येथील न.ह.रांका हायस्कूल विद्यालयाची विद्यार्थिनी गायत्री दिलीप चौधरी ही १०वीच्या परीक्षेत (९२.८० टक्के) प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. त्यानिमित्त गायत्री आणि तिच्या पालकांचा सेवा फाउंडेशनकडून नुकातच सत्कार केला. गायत्रीला सेवा फाउंडेशनकडून शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.विशाल चौधरी, डॉ.वैभव पाटील, डॉ.दिलीप तेली, धनगर सर, विवेक वखरे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष अतुल अग्रवाल, दिलीप तेली यांच्यासह पालक उपस्थित होते.

Read More

साईमत, बोदवड : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी मुंबईद्वारा आचार्य नंददुलारे वाजपेयी समीक्षा पुरस्काराने महाविद्यालयाचे माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ.मधुकर खराटे यांना सन्मानित केल्याबद्दल बोदवड एज्युकेशन सोसायटी व कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय हिंदी विभागातर्फे सत्कार नुकताच सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी ॲड. प्रकाशचंद सुराणा होते. यावेळी संस्थेचे संचालक श्रीराम बडगुजर, विजयकुमार कोटेचा, अशोक जैन, आनंद जैस्वाल, रवींद्र माटे, कैलास खंडेलवाल, मंजुलता सुराणा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष मिठूलाल अग्रवाल यांनी डॉ.खराटे यांचे कौतुक केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव विकास कोटेचा यांनी डॉ. खराटे यांचे हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे. तसेच हिंदी जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर बोलली जाते, असे मनोगतातून…

Read More