यावल तालुक्यात ट्रकसह सव्वा बारा लाखांचा सागवान जप्त

0
3

साईमत, यावल : प्रतिनिधी

उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव यांच्याकडून सोमवारी, १४ रोजी दुपारच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय बातमीवरून यावल ते किनगाव रस्त्याने गस्त करीत असताना चुंचाळे गावाजवळ संशयित वाहनाचा (क्र.एमएच २८ बी ८५४३) अटकाव करून वाहनाची तपासणी केली. तेव्हा त्यात अवैध विनापरवाना लाकूड तसेच यावल ते हरिपुरा रस्त्याने गस्त करीत असताना वाहन (क्र. एचआर- ४७ बी ०६७२) वाहनात अवैध लाकूड भरलेले दिसले. वाहन चालकाकडे लाकूड वाहतूक परवाना मिळून आला नाही. प्रथमदर्शनी वन गुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्याने मुद्देमालासह वाहन पुढील चौकशीसाठी ताब्यात घेऊन यावल येथे शासकीय आगारात आणून ताबा पावतीने जमा केले आहे. वनविभागाने कारवाईत ट्रकसह सव्वा बारा लाखांचा सागवान जप्त केला आहे.

सविस्तर असे की, इमारती लाकूड अंदाजे १३.००० घ.मी.मा.१६१०० किंमत रुपये व जप्त वाहन (क्र.एमएच-२८ बी ८५४३) ट्रक किंमत अंदाजे ७,००,००० रुपये एवढा आहे. याप्रकरणी निंबादेवी यांनी प्र. रि. क्र. ११/२०२३, ११ रोजी लागू केला आहे. वाहन चालक जियाफतआली नजाफतआली (रा.सुरत गुजरात), पंचरस जळाऊ लाकूड अंदाजे ४:०० घ. मी. ४५०० किंमत रुपये व जप्त वाहन (क्र. एचआर-४७ बी ०६७२) माल ट्रक किंमत ५,००,००० रुपये एवढा आहे. याप्रकरणी व. र. हरिपूरा यांनी प्र री. क्र. ०८/२०२३, ११ ऑगस्ट २०२३ ला लागू केला. आरोपी वाहन चालक जब्बार बेग सत्तरबेग (रा. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) दोन्हीं गुन्हे प्रकरणावर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१(२) ब, ४२, ५२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. कारवाईत वनक्षेत्रपाल यावल पूर्व आणि स्टाफ तसेच वनक्षेत्रपाल यावल प.व स्टाफ यांनी सहभाग घेतला.

यांनी केली कारवाई

ही कारवाई ऋषिकेश रंजन वनसंरक्षक धुळे, जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव, प्रथमेश हाडपे सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक व कॅम्प यावल यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल यावल पश्चिम सुनील भिलावे, वनक्षेत्रपाल यावल पूर्व अजय बावणे, वनपाल अतुल तायडे, रवींद्र तायडे यांच्यासह वन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here