भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये वृक्षारोपण

0
3

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचालित कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या समारोपनिमित्त भारतीय वायुसेनेचे सेवानिवृत्त अधिकारी दिनकर सोनवणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका सीमा वैजापूरकर, पर्यवेक्षक एस.पी.निकम आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन वृक्ष लागवड आणि वृक्ष संगोपन करण्याचे आवाहन श्री. सोनवणे यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या रॅलीला दिनकर सोनवणे यांनी झेंडा दाखविला. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here