Author: Sharad Bhalerao

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचा माजी विद्यार्थी भूषण रवींद्र माळी याची स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारा आयटीबीपीमध्ये जीडी ट्रेडसाठी निवड झाली आहे. देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय.आर.महाजन, एस.के.महाजन, एच.ओ.माळी यांनी भूषणच्या घरी जाऊन सहकुटुंब परिवाराचा सत्कार केला. त्याच्या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी भूषणचे आजोबा देवगाव देवळी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष तथा माजी सरपंच नवलदादा पाटील, वडील रवींद्र पाटील, आई उपस्थित होत्या. देवगाव देवळी येथील अनेक माजी विद्यार्थी जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. येणाऱ्या काळात अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपला नावलौकिक करून गावाचा व शाळेचे नाव…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथे येत्या २ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत होणार असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी व पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली. अमळनेर येथील साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन दिले. अमळनेरात फेब्रुवारीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या दृष्टीने मराठी वाड़मय मंडळाने जोरदार तयारी सुरू केली आहे. संमेलनासाठी शासन स्तरावरुन भरीव सहकार्य मिळावे. हे साहित्य संमेलन अविस्मरणीय व्हावे, यासाठी नुकतीच मराठी वाड़मय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. चर्चेत साहित्य…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी संपूर्ण जगाचे लक्ष वेधलेल्या व सर्वांनाच उत्सुकता लावणाऱ्या भारताने चंद्रावर पाठविलेल्या ‘चांद्रयान-३’ चे बुधवारी सायंकाळी ६ वाजून ४ मीनिटांनी लँडिंग झाले. ही एक ऐतिहासिक गोष्ट असल्यामुळे त्यांचा सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभव घ्यावा या उद्दिष्टाने प्रगती विद्यामंदिर शाळेतील शिक्षक मनोज भालेराव व विज्ञान लॅब असिस्टंट विजय चव्हाण यांनी हुबेहूब ‘चांद्रयान-३’ची प्रतिकृती बनविली. शिक्षक मनोज भालेराव यांनी विद्यार्थ्यांना आजच्या दिवसाचे महत्व तसेच लाईव्ह प्रसारित होणाऱ्या ‘चांद्रयान-३’च्या लँडिंगला नक्कीच बघावे, याविषयी मार्गदर्शन केले. चंद्रावर जात असलेले हे भारतीय अंतराळ संशोधन यान हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. याठिकाणी आतापर्यंत कुठलेही यान पोहोचलेले नाही, असे सांगितल्याची माहिती आहे. म्हणून संपूर्ण जगभरातील…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील निम येथे आई-वडिलांसोबत शेतात निंदणीसाठी गेलेल्या विवाहित तरुणाचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सविस्तर असे की, तालुक्यातील निम येथील वासुदेव रामसिंग पाटील उर्फ लोटण (वय ३३) हा आई वडिलांसह कळमसरे रस्त्यावरील शेतात निंदणीसाठी गेला होता. दुपारी त्याचे आई-वडील घरी आले. मात्र, तो निंदणीच्या कामासाठी शेतातच थांबून होता. साडेचार वाजले तरी वासुदेव घरी परतला नाही. म्हणून त्याची आई त्याला पाहण्यासाठी गेली. तेव्हा तो शेतातील झाडाखाली झोपलेला आढळून आला. त्याला उठविल्यावर तो उठत नसल्याने त्याला आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलवून त्यास गाडीत टाकून अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. तेव्हा…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी मायबोली अहिराणीतूनच शपथ घेईल म्हणत संपूर्ण विधानसभा वेठीस धरून विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांना ‘सळो की पळो’ करून सोडणाऱ्या तत्कालीन मुलुख मैदान तोफ माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील (वय ९०) यांचे मंगळवारी, २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे सात वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी, २३ रोजी दुपारी २ वाजता दहिवद, ता.अमळनेर येथून निघणार आहे. गुलाबराव पाटील हे तीन वेळा एकूण १३ वर्षे जनता दलाचे आमदार होते. त्यांच्या शेतकऱ्यांसाठी शिंगाडे मोर्चा, सभागृहातून राजदंड पळविणे आदी भूमिका लक्षवेधी ठरल्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते गुणवंत पाटील यांचे वडील तर अमळनेर शिक्षण…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी खान्देशचे खा.उन्मेष पाटील यांनी धरणगाव आणि अमळनेर स्टेशन अमृत भारत स्कीम अंतर्गत मंजूर केल्याबद्दल मंत्र्यांचे भ्रमणध्वनीद्वारे आभार व्यक्त केले. तसेच विविध मागण्यांविषयी सकारात्मक चर्चा होऊन भुसावळ-पुणे नवीन गाडी व्हाया धरणगाव-अमळनेर-नंदुरबार-पुणे मार्गे सुरू करण्यासंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या मागण्यांविषयी त्यांनी आश्वासनही दिले आहे. भारतीय जनता पार्टी, धरणगाव, अमळनेर तालुका व रेल्वे सल्लागार समिती यांनी रेल्वेविषयी सुचविलेल्या विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना शासकीय दौऱ्यावेळी जळगाव येथे डीआरयुसीसी मेंबर प्रतिक जैन यांच्याकडून देण्यात आले. निवेदनात प्रामुख्याने भुसावळ ते पुणे वाया धरणगाव-अमळनेर-नंदुरबार – पुणे नवीन गाडी सुरू करणे, सुरत-भुसावळ पॅसेंजरच्या…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे आयोजित रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० मधील रोटरी क्लबच्या सदस्यांसाठी आयोजित ‘मेंबरशिप अँड न्यू जनरेशन सेमिनार’ उत्साहात पार पडले. येथील डॉ. सुरेशदादा पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित सेमिनारचे उद्घाटन रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे माजी प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला, माजी प्रांतपाल तथा फोरम लीडर राजीव शर्मा, महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे सह प्रांतपाल डॉ. राहुल मयूर, सचिव रश्मी शर्मा, रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष चेतन टाटिया, सचिव अर्पित अग्रवाल, निमंत्रक नितीन अहिरराव, सहनिमंत्रक नितीन जैन यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन, प्रतिमा पूजन केले. याप्रसंगी राजीव शर्मा, ॲड. संदीप पाटील,…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील बी. पी. आर्टस्‌‍‍ , एस.एम. ए. सायन्स अँण्ड के. के. सी. काँमर्स महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने “युवा संवाद” कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. यावेळी सर्पमित्र राजेश ठोंबरे, उपप्राचार्य डॉ.ए.व्ही.काटे, उप-प्राचार्या डॉ.के.एस.खापर्डे, प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मनोज गोविंदवार (जळगाव) यांनी आपल्या मनोगतात युवकांमधील असिमीत क्षमता सृजनशिलतेतून वृध्दिंगत करता येते. भविष्यात स्वतःला सिद्ध करण्यासाठी युवकांनी कला गुणांचा अंगीकार करावा, याविषयी मार्गदर्शन केले. मिनाक्षी निकम (राज्यपाल नियुक्त, क.ब.चौ.उ.म.वि. जळगाव, सिनेट सदस्या) यांनीही युवकांशी संवाद साधला. युवकांनी स्वतःचा सन्मान करावा, दुसऱ्याच्या हातातील कटपुतलीसारखे जीवन न जगता, ध्येय…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक हजरत पिर मुसा कादरी उर्फ बामोशी बाबा येथे दररोज हजारो संख्येने भाविक यांची दर्शनासाठी ये-जा सुरु असते. गुरुवारी दर्ग्यावर जास्त भाविक येतात. त्यात राज्यभरातून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. याठिकाणी मुजावर यांनी भाविकांसाठी शौचालय व बाथरूम व राहण्याची व्यवस्था करावी. अन्यथा, आ.मंगेश चव्हाण यांच्याकडे आमदार निधीची मागणी करावी. त्यामुळे याठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध होतील, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, फरिश्ता फाउंडेशनचे अध्यक्ष आदिल चाऊस यांनी केली आहे. याठिकाणी बाहेर दुकानदारांनी खूप अतिक्रमण केले आहे. बेकायदेशीर असलेले अतिक्रमण नगरपालिकेने काढावे, याठिकाणी २० शौचालय बांधण्यात यावे, बाथरूम व भाविकांच्या सोयीसाठी भक्त निवास व याठिकाणी स्वच्छता नसते.…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या कार्यव्यस्ततेमुळे जळगाव जिल्ह्यातील पहिला तालुकास्तरीय “शासन आपल्या दारी”साठी २६ ऑगस्ट रोजी होणारा पाचोरा दौरा तूर्त स्थगित झाला आहे. लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, उपजिल्हा प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली. शासनाच्या लोककल्याणकारी योजना व व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा लाभ गरजू नागरिकांना मिळावा यासाठी राज्य शासनाच्यावतीने राज्यभर “शासन आपल्या दारी” या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन जिल्हानिहाय सुरू आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून तालुकास्तरीय “शासन आपल्या दारी” हा उपक्रम घेण्याचे नियोजन केले आहे. जळगाव जिल्ह्यातील पहिला…

Read More