देवगाव देवळी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्याची पॅरा मिलिटरीत निवड

0
4

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचा माजी विद्यार्थी भूषण रवींद्र माळी याची स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारा आयटीबीपीमध्ये जीडी ट्रेडसाठी निवड झाली आहे. देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय.आर.महाजन, एस.के.महाजन, एच.ओ.माळी यांनी भूषणच्या घरी जाऊन सहकुटुंब परिवाराचा सत्कार केला. त्याच्या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी भूषणचे आजोबा देवगाव देवळी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष तथा माजी सरपंच नवलदादा पाटील, वडील रवींद्र पाटील, आई उपस्थित होत्या. देवगाव देवळी येथील अनेक माजी विद्यार्थी जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. येणाऱ्या काळात अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपला नावलौकिक करून गावाचा व शाळेचे नाव राज्यपातळीवर नावलौकिक करतील, अशी अपेक्षा मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here