दर्गा परिसरातील अतिक्रमण काढावे

0
3

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक हजरत पिर मुसा कादरी उर्फ बामोशी बाबा येथे दररोज हजारो संख्येने भाविक यांची दर्शनासाठी ये-जा सुरु असते. गुरुवारी दर्ग्यावर जास्त भाविक येतात. त्यात राज्यभरातून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. याठिकाणी मुजावर यांनी भाविकांसाठी शौचालय व बाथरूम व राहण्याची व्यवस्था करावी. अन्यथा, आ.मंगेश चव्हाण यांच्याकडे आमदार निधीची मागणी करावी. त्यामुळे याठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध होतील, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, फरिश्ता फाउंडेशनचे अध्यक्ष आदिल चाऊस यांनी केली आहे.

याठिकाणी बाहेर दुकानदारांनी खूप अतिक्रमण केले आहे. बेकायदेशीर असलेले अतिक्रमण नगरपालिकेने काढावे, याठिकाणी २० शौचालय बांधण्यात यावे, बाथरूम व भाविकांच्या सोयीसाठी भक्त निवास व याठिकाणी स्वच्छता नसते. या जागेवर मुक्कामी थांबलेले काही भाविक येथेच घाण कचरा टाकत असल्याचे समजते. दर्गा ठिकाणी असलेले मुजावर यांनी येथे आलेल्या भाविकांची अधिकृत नोंदणी केली पाहिजे. नदीपात्र जागेवर दुकाने अतिक्रमणमध्ये असतांना काही दुकानदार विक्री करत असल्याची माहिती मिळते. त्याची चौकशी नगरपालिकेने करावी, अशीही मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here