अमळनेरातील मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करणार

0
3

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथे येत्या २ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत होणार असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी व पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली. अमळनेर येथील साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.

अमळनेरात फेब्रुवारीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या दृष्टीने मराठी वाड़मय मंडळाने जोरदार तयारी सुरू केली आहे. संमेलनासाठी शासन स्तरावरुन भरीव सहकार्य मिळावे. हे साहित्य संमेलन अविस्मरणीय व्हावे, यासाठी नुकतीच मराठी वाड़मय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. चर्चेत साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारी व नियोजनाची माहिती देण्यात आली.

संमेलन सर्वार्थाने यशस्वी होईल

अमळनेर येथे होत असलेले साहित्य संमेलन सर्वार्थाने यशस्वी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी राज्य शासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, अमळनेरचे आमदार व राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.अनिल पाटील, ना.संजय राठोड, ना.दीपक केसरकर आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here