Author: Sharad Bhalerao

साईमत, जळगाव : प्रतिनिधी सिनियर राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पुरुषांच्या ८७ किलो आतील वजन गटात जैन स्पोर्टस्‌‍‍ ॲकडमीच्या पुष्पक महाजनला सुवर्ण तर निलेश पाटील, रोहन लोणारी, हेमंत गायकवाड यांना रौप्य, महिलांमध्ये गौरी कुमावतला कांस्यपदक प्राप्त झाले. यामुळे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत जैन स्पोर्टस्‌‍‍ ॲकॅडमीच्या खेळाडूंनी पदकांची कमाई केली आहे. तसेच आसामला होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात पुष्पक महाजनची निवड झाली आहे. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई व जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन यांच्या सहकार्याने २२ ते २३ ऑगस्ट रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल येथे ३३ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरूष व महिला तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष तथा प्रसिध्द अभिनेते प्रशांत दामले यांच्यासोबत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेच्या कार्यकारिणीची बैठक गुरुवारी, २४ रोजी पार पडली. सुरुवातीला मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जळगाव जिल्हा शाखेकडून अभिनेते प्रशांत दामले यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर शाखा विस्तार व पुढील वर्षभरात करावयाच्या कार्यक्रमांचे नियोजनाबाबत प्रशांत दामले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेकडून घेण्यात येणाऱ्या एकांकिका स्पर्धांची प्राथमिक फेरी जळगाव येथे घेण्याबाबत चर्चा झाली. यांची होती उपस्थिती बैठकीला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेच्या…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी देशाच्या युवकांमध्ये नवकल्पना आणि सृजनशीलतेला चालना देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. तुमच्याकडे उद्योगाची अनोखी कल्पना असेल तर यशापासून तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही. तसेच सध्या इनोव्हेशनची गरज प्रत्येक क्षेत्रात आहे. एखादा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी ते एखाद्या मशीनमधील अडचण शोधण्यासाठी इनोव्हेशनची गरज असते. कालानुरुप इनोव्हेशन हे क्षेत्र विस्तारत आहे. आज इतर क्षेत्राप्रमाणेच इनोव्हेशन क्षेत्रातही विद्यार्थ्यांना अनेक संधी खुणावत असल्याचे आशिष पानट यांनी सांगितले. तसेच इनोव्हेशन क्षेत्र, त्यात असलेल्या संधी आणि या क्षेत्राचा समाजासाठी जास्तीत-जास्त उपयोग कसा करावा, याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात शुक्रवारी, २५ रोजी “इनोव्हेशन इन सायन्स…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी ममुराबाद येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिस पटेल यांचा कार्यकाळ संपल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य आरती सचिन पाटील यांची उपसरपंचपदी शुक्रवारी, २५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता ग्रामपंचायतीच्या कार्यालयात एकमताने निवड करण्यात आली. ही निवड सरपंच हेमंत पाटील, ग्रामविकास अधिकारी कैलास देसले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमर पाटील, अनिस पटेल, गोपाळ मोरे, विलास सोनवणे, शैलेश पाटील, संतोष कोळी, एजाज पटेल, अंजना शिंदे, खातूनबी शेख रसीद, सुनीता चौधरी, रंजना ढाके, लता तिवारी, पोलीस पाटील आशा पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील दत्तात्रय पाटील, विलास शिंदे, ज्ञानेश्वर पाटील, संदीप पाटील, जितेंद्र पाटील, विलास पाटील, आत्माराम पाटील, नितीन पाटील आदी उपस्थित…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी शहरातील कांचन नगरातील भैय्याची वखारजवळील आगीतील नुकसानग्रस्तांना आदिवासी कोळी समाज बहुउद्देशीय संस्थेेने सामाजिक बांधीलकी जोपासत मदतीचा हात पुढे केला आहे. नुकसानग्रस्त सुभाष भाऊलाल बाविस्कर आणि महिला परिवाराला आदिवासी कोळी समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे ११ हजाराची रक्कम रोख स्वरूपात देण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भारत सपकाळे, समाज सेवक भिकन नन्नवरे, भरत महाराज सपकाळे, रोहन सोनवणे, अनिल कोळी, रवी पाटील, गोकुळ सूर्यवंशी, जितू सोनवणे, अक्षय सोनवणे, रवी कोळी, नारायण सपकाळे, मनोज सपकाळे, आनंद सपकाळे, रामचंद्र तायडे, संजय बाविस्कर, रमाकांत सोनवणे, भगवान जैतकर, समाधान नन्नवरे, शिवाजी सूर्यवंशी, आप्पा नन्नवरे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील पंचशील नगरातील (तांबापुरा) रहिवाशांचे पुरसदृश्य परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानाची त्वरित भरपाई मिळावी, अशी आशयाची मागणी जिल्हाधिकारी तसेच आ.एकनाथराव खडसे यांच्याकडे रहिवाशांनी निवेदनाद्वारे केली आहे. वंचित राहिलेल्या रहिवाशांना नुकसानीची त्वरित भरपाई न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन देतेवेळी अशोक लाडवंजारी, विकार खान, असलम काकर, नियाजोद्दीन शेख यांच्यासह समस्त पंचशील नगरातील रहिवाशी उपस्थित होते. जळगावसह राज्यात ६ जुलै २०२३ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचशील नगरात लोकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे येथील हातमजुरीवर जीवन जगणाऱ्या लोकांच्या घरातील फ्रिज, कुलर, टीव्ही, वापरण्यात येणाऱ्या कपड्यांसह दैनंदिन लागणारे जीवनावश्यक वस्तूंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी कापूस पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव दिसत असताना शेतकरी त्याबाबत सतर्क नाहीत. गुलाबी बोंडअळीकरीता शेतकऱ्यांनी जागरूक राहिले पाहिजे. त्यामुळे उत्पादन तर कमी मिळेल. शिवाय कापसाची गुणवत्ता चांगली मिळणार नाही. म्हणून शेतकऱ्यांनी कापूस पिकातील गुलाबी बोंडअळीचे गांभीर्य लक्षात घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन संचालक डॉ.भागीरथ चौधरी यांनी केले. दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्र, जोधपूर आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने जामनेर तालुक्यातील पळासखेडे (मिराचे) येथील दिनेश पाटील ह्यांच्या कापूस शेतात आयोजित ‌‘कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी जागरूकता आणि व्यवस्थापन‌’ याविषयावरील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कापूस लावणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने कापूस पिकाचे आर्थिक नुकसान टाळण्याकरीता कापूस पिकात गुलाबी…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, पारोळा, अमळनेर आणि धरणगाव अशा ७ तालुक्यातील ७८ ठिकाणी जनावरांमध्ये सांसर्गिक लम्पी आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या तालुक्यातील सर्व जनावरांचा आठवडे बाजार हा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. या तालुक्यातील जनावरे लम्पी साथ रोगाने बाधीत जनावरे आढळून आल्याने तसेच या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर भागातील निरोगी पशुधनास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा रोग विषाणुजन्य सांसर्गिक रोग असल्याने या रोगाचा प्रसार होऊ नये. म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ अंमलात आणण्यासाठी प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगप्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार जनावरांची खरेदी विक्रीसाठी ७ तालुक्यातील गुरांचे सार्वजनिक…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील चैतन्य तांड्यात सरपंच अनिता राठोड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी महिला ग्रामसभा व ग्रामसभा घेण्यात आली. दरम्यान विद्यार्थ्यांना होणारी गैरसोय लक्षात घेता ग्रामनिधीतून येथील अंगणवाडीस गॅस कनेक्शनासाठी रक्कम वितरीत करण्यात आला. चाळीसगाव तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायत ही विविध विकासकामांमुळे नेहमी चर्चित असते. ग्रामस्थांना प्राथमिक सोयीसुविधा मिळावे, यासाठी ग्रामपंचायत नेहमी तत्पर राहते. शुक्रवार रोजी ग्रामपंचायतीत महिला ग्रामसभा सरपंच अनिता राठोड यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी महिलांच्या सबलीकरणावर मार्गदर्शन करण्यात आले. अंगणवाडीत गॅस नसल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. अशात ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामनिधीतून साडेसहा हजार रुपये सुपूर्द केले. यामुळे आता अंगणवाडीत गॅस कनेक्शन मिळणार आहे. यांची…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील हिरापूर रोड, खान्देश बाजार मंगल कार्यालय येथे खाटीक समाजाचा जळगाव जिल्हा मेळावा आयोजित केला होता. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार सोहळा झाला. कार्यक्रमासाठी आ.मंगेश चव्हाण, उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या संस्थापक-अध्यक्षा संपदा पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एमपीएससी सरकारी अभियोक्ता परीक्षा उत्तीर्ण ॲड. इस्राईल युसुफ खाटीक (धरणगाव) तसेच सामाजिक कार्यकर्ते कैसर खाटीक यांचा जीवनगौरव पुरस्कार देवून संपदा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संपदा पाटील यांनी गुणवंतांचे कौतुक करीत समाज बांधवांच्या एकीचे कौतुक केले. व्यासपीठावर खाटीक समाज राष्ट्रीय अध्यक्ष एल. ए.शेख, पत्रकार मुक्ती हारून नदवी, आयोजक कैसर खाटीक, रोटरी…

Read More