चाळीसगावला खाटीक समाजाचा मेळावा

0
2

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

शहरातील हिरापूर रोड, खान्देश बाजार मंगल कार्यालय येथे खाटीक समाजाचा जळगाव जिल्हा मेळावा आयोजित केला होता. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार सोहळा झाला. कार्यक्रमासाठी आ.मंगेश चव्हाण, उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या संस्थापक-अध्यक्षा संपदा पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी एमपीएससी सरकारी अभियोक्ता परीक्षा उत्तीर्ण ॲड. इस्राईल युसुफ खाटीक (धरणगाव) तसेच सामाजिक कार्यकर्ते कैसर खाटीक यांचा जीवनगौरव पुरस्कार देवून संपदा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संपदा पाटील यांनी गुणवंतांचे कौतुक करीत समाज बांधवांच्या एकीचे कौतुक केले. व्यासपीठावर खाटीक समाज राष्ट्रीय अध्यक्ष एल. ए.शेख, पत्रकार मुक्ती हारून नदवी, आयोजक कैसर खाटीक, रोटरी जेसीआयचे अफसर खाटीक, शकील खाटीक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here