दीड महिन्यापासून तांबापुऱ्यातील रहिवाशी नुकसान भरपाईपासून वंचित

0
3

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

येथील पंचशील नगरातील (तांबापुरा) रहिवाशांचे पुरसदृश्य परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानाची त्वरित भरपाई मिळावी, अशी आशयाची मागणी जिल्हाधिकारी तसेच आ.एकनाथराव खडसे यांच्याकडे रहिवाशांनी निवेदनाद्वारे केली आहे. वंचित राहिलेल्या रहिवाशांना नुकसानीची त्वरित भरपाई न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन देतेवेळी अशोक लाडवंजारी, विकार खान, असलम काकर, नियाजोद्दीन शेख यांच्यासह समस्त पंचशील नगरातील रहिवाशी उपस्थित होते.

जळगावसह राज्यात ६ जुलै २०२३ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचशील नगरात लोकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे येथील हातमजुरीवर जीवन जगणाऱ्या लोकांच्या घरातील फ्रिज, कुलर, टीव्ही, वापरण्यात येणाऱ्या कपड्यांसह दैनंदिन लागणारे जीवनावश्यक वस्तूंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर तलाठीकडून नुकसानाचे पंचनामे होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटूनही नागरिकांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी ७ ऑगस्ट २०२३ रोजी मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते. मात्र, आजतागायत भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे निवेदनाची दखल घेवून नागरिकांना त्वरित भरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. परिस्थितीची जाणीव ठेवून न्याय मिळावा, अशीही अपेक्षा स्मरणपत्राद्वारे व्यक्त केली आहे.

निवेदनावर पंचशील नगरातील रहिवासी (तांबापुरा) विकार खान, असलम काकर, नियाजोद्दीन शेख, आसिफ शाह बापू, लुकमान शेख, अहेमद खान शफी शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here