साईमत, शिंदखेडा : प्रतिनिधी माजी मंत्री तथा विद्यमान आ.जयकुमार रावळ यांच्या प्रयत्नाने २२ कोटी रुपये खर्च करून पूर्ण झालेल्या शिंदखेडा शहर पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी, १५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होत आहे. यावेळी शिंदखेडा येथील गांधी चौकात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पर्यटन मंत्री व आमदार जयकुमार रावळ असतील. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन, माजी संरक्षण राज्यमंत्री खा.डॉ. सुभाष भामरे, माजी शिक्षण मंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल, शिंदखेडा शहराच्या नगराध्यक्षा रजनी वानखेडे, माजी जि.प.उपाध्यक्ष कामराज निकम,…
Author: Sharad Bhalerao
साईमत, शिंदखेडा : प्रतिनिधी हिंदू आणि मुस्लिम बांधवांना आपले सण एकोप्याने साजरे करता यावे, यासाठी गुरुवारी, २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन तर २९ सप्टेंबर रोजी मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद सण साजरा करण्यात येणार आहे. हा निर्णय शिंदखेडा पोलीस स्टेशनला झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीस तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन हिरे, नगरपंचायत प्रशासक प्रशांत बिडगर, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, पोलीस निरीक्षक दीपक पाटील, महावितरण कंपनीचे अभियंता तीनखेडे उपस्थित होते. अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे हिंदू-मुस्लिम बांधवांचे सण एकाच दिवशी येत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. बैठकीत २९…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील अडावद प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत “क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत” उपक्रमांतर्गत निवड झालेले अडावद, वटार व रुखणखेडा या गावांमध्ये क्षयरोग आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये यांच्या आदेशानुसार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकरीता निबंध व विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तसेच ग्रामसभा व चावडी बैठका घेवून त्यात क्षयरोग आजाराविषयी सखोल माहिती देण्यात आली. यावेळी क्षयरोगमुक्त ग्रामपंचायतींना भेट देऊन “टीबी सपोर्ट ग्रुप” ची स्थापना करण्यात आली. वटार येथील जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी जनजागृतीसाठी गावात प्रभातफेरी…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील ‘मिल के चलो’ असोसिएशन सेवाभावी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यानिमित्त अमळनेर तालुक्यातील विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जळगाव येथील नोबेल फाउंडेशनचे संस्थापक जयदीप पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारची विज्ञान शिक्षण संस्था आयसर (IISER), पुणे येथील संस्थापक शास्त्रज्ञ डॉ.अरविंद नातू होते. कार्यशाळेत ‘विज्ञान शिक्षण आणि संशोधनातील संधी’ यावर डॉ.नातू यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. जयदीप पाटील यांनी शिक्षकांना नोबेल पारितोषिक मिळविणारे मुले कसे घडविता येतील, याबाबत मार्गदर्शन केले. ‘मिल के चलो’ असोसिएशनचे संस्थापक अनिरुध्द पाटील, कल्याणी पाटील यांनी संस्था नेहमीच शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील, असे आश्वासन…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बिलाखेड येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मारुती मंदिरात चिमुकल्यांनी घंटानाद केला. यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षण देवून मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी केली. महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देऊन मराठा समाजाच्या तरुणांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकारने मराठा आरक्षणाचा लवकर निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय देण्याची मागणीसाठी तालुक्यातील बिलाखेड येथे मारुती मंदिरात चिमुकल्यांनी घंटानाद केला. आंदोलनात मधुकर (साई बाबा) पाटील, आप्पा हाडपे, समाधान जाधव, ईश्वर महाडिक, शैलेश गवारे, सुनील पाटील, रोहित निकुंभ, पवन निकुंभ, योगेश जाधव, ऋषीकेश निकुंभ, गौरव गवारे, जय गवारे, ओम गवारे, पवन गवारे यांनी सहभाग घेतला.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी ‘आयुष्मान भव’ योजनेअंतर्गत राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांनी भारतीयांना आरोग्याच्या पंधरवड्यात अधिकाधिक सहभागी होऊन पाच लाखापर्यंतच्या सेवेचा लाभ घेण्याचा आवाहन केले आहे. जास्तीत जास्त गोरगरीब लोकांपर्यंत ‘आयुष्मान भव’ योजनेअंतर्गत आरोग्य मोफत तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे ही योजना सर्वसामान्यांसाठी संजीवनी ठरणार असल्याचे प्रतिपादन उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदा पाटील यांनी केले. चाळीसगाव येथील महात्मा फुले जन आरोग्य संकुलात ‘आयुष्मान भव’ योजनेअंतर्गत आरोग्य मेळावा आयोजित केला होता. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. केंद्र शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भव:’ मोहिमेचा देशाच्या राष्ट्रपती महामहीम श्रीमती द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. चाळीसगाव येथील महात्मा फुले जन आरोग्य…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी या नभाने या भुईला दान द्यावे, मीच माझा एककल्ली एकटा चालीत गेलो, पाण्यात लगटले पाय, फुलात न्हाली पहाट ओली यासारख्या अजरामर कवितांनी आनंदयात्री परिवार निर्मित’आठवणीतील महानोर’ कार्यक्रमाने जामनेरकर रसिक भारावले होते. रानकवी स्व.ना.धों.महानोर यांना आदरांजली वाहणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब व आनंदयात्री परिवार यांच्यावतीने केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी अभियंता जे. के.चव्हाण, परिवर्तनचे रंगकर्मी शंभू पाटील, अभिनेते हर्षल पाटील, सोनाली पाटील आदी उपस्थित होते. सुरुवातीला ‘जात्यावरची ओवी’ सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ‘मी रात टाकली’, आम्ही ठाकरं ठाकरं, गोऱ्या देहावरची कांती, भरलं आभाळ, घन ओथंबूनी येती…यासारख्या गीतांनी कार्यक्रम लक्षवेधी ठरला. कार्यक्रमात डॉ.प्रज्ञा साठे,…
रावेर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. तो कायम ताब्यात ठेवण्यासाठी भाजपा निवडणूक लढवेल. ताकद आणि प्रतिष्ठा पणाला लावेल. पण प्रश्न हा आहे की, भाजपा रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देईल का? रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देणं भाजपासाठी रिस्क असेल. कारण रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे आहेत. आज जरी दाखवले जात असेल की, खडसे सासरा आणि सून यांच्यात राजकीय मतभेद आहेत. पण तसे उघड चित्रं अजून कुठेही दिसले नाही. समजा भाजपाने रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली तरी त्यांना निवडून आणण्याची अप्रत्यक्ष जबाबदारी ही एकनाथ खडसे यांच्यावर येऊन पडणार आहे. म्हणजे जे बारामती…
भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. प्राचीन काळापासून शेती व्यवसायावर लोक आपला उदरनिर्वाह करत आहेत. भारतात प्रमुख व्यवसाय म्हणून शेतीकडे पहिले जाते. भारतात ६० टक्क्याच्यावर लोक शेती हा प्रमुख व्यवसाय करतात. भारतात सामाजिक आर्थिक विकासात शेती या प्रमुख व्यवसाय आहे. अशा प्रमुख व्यवसाय असलेल्या भारतात शेतकऱ्याला म्हणजेच बळीराजाला प्रमुख सात असतील त्याच्या पशुधनाची. पशुधनात काय बैल, बकरी, म्हैस यासारखे जनावरे पशुधन म्हणून पाळले जातात. त्यात प्रमुख प्रशासन म्हणून बैल या प्राण्याकडे पाहिले जाते. प्राचीन काळापासून शेतकऱ्याला शेती व्यवसायात मदत करत असलेला बैल (सर्जा) हा शेतकऱ्याचा मित्र आहे. सर्जाराजाचा सण भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने साजरा करतात. महाराष्ट्रात आसन ‘बैलपोळा’ नावाने…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्यावतीने गणेश चतुर्थीनिमित्त तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरणाची सुरुवात केली आहे. शासकीय विश्रामगृह येथे तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरणास आ.लता सोनवणे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी आ.चंद्रकांत सोनवणे, चोपडा भाग उपविभागीय अधिकारी बंगाळे, नायब तहसीलदार देवेंद्र नेतकर, गोदाम व्यवस्थापक योगेश नन्नवरे, पुरवठा निरीक्षक सुदर्शन दुर्योधन आदींसह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण चोपडा तालुक्यात ४६ हजार ८०८ लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये चना डाळ, रवा, साखर व खाद्यतेल समाविष्ट आहे. पात्र लाभार्थ्यांना तातडीने वितरणाची सुरुवात केली आहे. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, संचालक रावसाहेब पाटील,…