साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील श्री रामकृष्ण हरी मंदिर येथे ‘माणुसकी समुहा’तर्फे शेंदुर्णीतील गीते डेंटल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेंद्र गीते यांच्या वाढदिवसानिमित्त ३१ झाडांचे वृक्षारोपण नुकतेच करण्यात आले. गावातील श्रीरामकृष्ण हरी मंदिरात झाडांचे वृक्षारोपण करून त्यांनी एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. दरवर्षी वाढदिवसाला वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘माणुसकी समुहा’चे निस्वार्थी कार्य पाहून प्रेरित झाल्याचे डॉ.महेंद्र गीते यांनी सांगितले. ‘माणुसकी समुहा’चे जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनीही वृक्षारोपण ही काळाची गरज हे समजावून सांगितले. यावेळी ‘माणुसकी समूह’ ग्रुपचे सदस्य डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण (दंत रोग तज्ज्ञ, नायर हॉस्पिटल, मुंबई ), रवींद्र कलाल, श्रीराम कलाल, गजानन क्षीरसागर,…
Author: Sharad Bhalerao
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील ब्राम्हणशेवगेसारख्या एका छोट्याशा गावातून क्रांतीकारक अविष्कार एका कष्टकरी शेतकरी पुत्राने घडविला आहे. प्रकाश सुनील पवार यांचे दोन नवीन संशोधन पेटेंट भारत सरकारच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाले. २० वर्षांसाठी एक अधिकारही प्राप्त झाला आहे. संशोधन क्रमांक १वॉटर कप टू टॅकल ड्रॉट सिचुएशन (पेटेंट अँप्लिकेशन नंबर २०२३२१०५२७७५ ) हे संशोधन शेतीसाठी वरदान ठरणार आहे. प्रकाश पवार यांच्या संशोधनामुळे शेतकऱ्यांना ‘आशेचा किरण’ मिळणार आहे. संशोधनात पिक लागवडीसाठी तसेच लागवडीपासून साधारण २ महिने जरी पिकाला पाणी मिळाले नाही तरी पिक तग धरू शकते, असा अविष्कारी फार्मुला अंमलात आणला आहे. निसर्ग, वरुणराजाच्या लहरीपणावर सहज फायदा या संशोधनामुळे शेतकऱ्यांना होणार आहे. यामुळे…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यात तब्बल १२ वर्षानंतर चाळीसगाव तालुक्यातील सर्व शासकीय विभागांची आमसभा आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी आ. मंगेश चव्हाण होते. नागरिकांनी आमसभा बैठकीचा आढावा फेसबुक लाईव्हवर घेतला. यावेळी सर्व स्तरावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या वार्डातील आणि ग्रामीण भागातील पाणी, रस्ते, वयोवृद्ध यांच्या अनेक प्रकारच्या समस्या आ.मंगेश चव्हाण यांनी जाणून घेतल्या. काही समस्या लागलीच सोडविल्या. काही जाणून घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना देऊन त्या समस्या सोडविण्यासाठी सूचना केल्या. त्याचा सर्व आढावा जे नागरिक कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकले नाही, त्यांनी फेसबुकवर लाईव्ह सुरु असलेल्या आमसभेचा आढावा आपल्या मोबाईलवरून फेसबुकच्या माध्यमातून जाणून घेतला.
साईमत, जामनेर : प्रतिनिधी जळगाव येथील महाबळ रोड येथील छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात रविवारी झालेल्या ‘दिव्यांग शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांमध्ये जामनेर नगरपालिकेतर्फे दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी अंतर्गत दहा लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. याप्रसंगी ‘दिव्यांग कल्याण विभाग, ‘दिव्यांगांच्या दारी अभियान’चे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक आ.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, भुसावळचे अनिल चौधरी, दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष पवन माळी, जामनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीकांत भोसले, देविदास अहिरे यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते. यावेळी आ. बच्चू कडू यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना प्रातिनिधीक स्वरुपात शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. तसेच लाभार्थ्यांना व्यासपीठावर बसण्याची संधीही मिळाली. दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी कार्यक्रमस्थळी विविध विभागांच्या २५…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी कुस्ती हा महाराष्ट्रातील मातीतला अस्सल रांगडा क्रीडा प्रकार. भारतासाठी पहिल्यांदा ऑलम्पिकमध्ये मिळालेले पदक हे कुस्ती या प्रकारातीलच होते. आणि ते मिळविणारे वीर आपल्या महाराष्ट्रातील खाशाबा जाधव होते. महाराष्ट्रात कुस्ती प्रेमी अनेक नव्या दमाचे तरुण उदयाला येत आहेत. त्यात चाळीसगाव तालुक्यातील एक नाव म्हणजे आर्यन शांताराम पाटील आहे. आर्यन पाटील गुड शेफर्ड शाळेत १० वीमध्ये शिक्षण घेत आहे. जिल्हा स्तरावरील कुस्ती स्पर्धेत ९२ किलो वजन गटात शाळेकडून त्याने कुस्ती खेळली. चाळीसगाव तालुक्यातून ८ विद्यार्थी सहभागी झालेले होते. त्यात जिल्हास्तरावर आर्यन शांताराम पाटील याने ९२ किलो वजनी गटातून बाजी मारत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविला. त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्व…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी पिलखोड येथे नवयुवक सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित, श्री रामचंद्र किसन महाजन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे शैक्षणिक वर्ष २०२१-२०२३ मधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव व पदवी प्रदान समारंभ नुकताच पार पडला. सुरुवातीला सरस्वती मातेचे पूजन व दीप-प्रज्ज्वलन संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन संस्थेच्यावतीने गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष यज्ञेश बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृषी विद्यालयाचे प्राचार्य रमेश एस. महाजन, आय.टी.आय.चे प्राचार्य सचिन बाविस्कर तसेच अध्यक्षीय भाषण संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश बाविस्कर यांनी करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना गुणपत्रकाचे वाटप करण्यात आले. यासाठी आय.…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर सध्या आहार संतुलन बिघडल्यामुळे बरेच आजार निर्माण होत आहे. त्यासाठी चांगला पोषक आहार घेणे गरजेचे आहे. त्यामध्ये तृण धान्याचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे शरीराला योग्य जीवनसत्वे मिळतात आणि रोग प्रतिकारकशक्ती चांगली राहते. चांगले आरोग्य असेल तर बालकाच्या शारीरिक व बौद्धिक विकास चांगला होतो. त्यासाठी दररोजच्या जेवणातील आहार योग्य असणे गरजेचे आहे, हे लक्षात घेता रोटवद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या सहकार्याने शालेय पोषण सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यात जवळपास १५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यासाठी परीक्षक म्हणून अ. चि.पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनेश पाटील आणि नांद्रा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जावळे यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी आदिवासी विकास विभागाकडून अनुदानित व शासकीय आश्रमशाळेतील प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या क्षमता चाचणी परीक्षेचे आयोजन केले होते. यावेळी यावल प्रकल्पांतर्गत ६८१ शिक्षकांची परीक्षा घेण्यात येणार होती. त्यापैकी तब्बल ६८० शिक्षकांनी परीक्षेवर बहिष्कार टाकत चाचणी परीक्षेकडे पाठ फिरविली. हा बहिष्कार शंभर टक्के यशस्वी झालेला असून शासनाच्या अन्यायविरुध्द कर्मचारी वर्गाने एकीचे बळ दाखवून दिले असल्याचे दिसून आले. याप्रसंगी स्वाभिमानी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष भरजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उपाध्यक्ष विजय कचवे, राज्य सहकार्यवाह भूपेंद्र पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष भालचंद्र पवार, तालुकाध्यक्ष विकास पाटील, हिवराळे, सत्रासेन संस्थेचे उपाध्यक्ष धनंजय भादले तसेच मुख्याध्यापक…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी जळगाव येथील अल्पबचत भवनात जळगावच्या ‘राजनंदनी फाउंडेशन’ यांच्यावतीने दिला जाणाऱ्या राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारांचे वितरण नुकतेच करण्यात आले. त्यात विजयनाना पाटील आर्मी स्कूलचे उपक्रमशील संगणक शिक्षक व्ही.डी.पाटील आणि विज्ञानचे उपक्रमशील शिक्षक संजय अमृत पाटील या दोघांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने मान्यवर सुरेश पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याबद्दल दोघा शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष विजय नवल पाटील तसेच कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, आर्मी स्कूलचे प्राचार्य पी.एम.कोळी यांच्यासह सर्व शिक्षकांकडून, सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील तोंडापूर परिसराला लागून असलेल्या सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात संतापजनक घटना समोर आली आहे. आंतरजातीय प्रेमसंबंधाच्या कारणावरून दोन भावांनी आई-वडील यांच्या चिथावणीवरून बहिणीची हत्या करुन ‘यमसदनी’ धाडले आहे. ‘मला वाचवा, कोठेतरी लपवा माझे भाऊ, आई-वडील मला मारून टाकतील’, असे ओरडत ती महिला राक्षा शिवारात आली असताना फिर्यादीने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयितांनी दांडगाई करीत फिर्यादीला मारहाण केली. नंतर स्वतःच्या बहिणीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. याप्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व संशयितांना अटक केल्याची माहिती ए.पी.आय. भरत मोरे यांनी दिली. याप्रकरणी तोंडापूर येथील शमीम शहा कासम शहा (वय ३०)…