पिलखोडला विद्यार्थ्यांचा गुणगौरव, पदवी प्रदान समारंभ

0
21

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

पिलखोड येथे नवयुवक सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित, श्री रामचंद्र किसन महाजन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे शैक्षणिक वर्ष २०२१-२०२३ मधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव व पदवी प्रदान समारंभ नुकताच पार पडला. सुरुवातीला सरस्वती मातेचे पूजन व दीप-प्रज्ज्वलन संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन संस्थेच्यावतीने गौरविण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष यज्ञेश बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृषी विद्यालयाचे प्राचार्य रमेश एस. महाजन, आय.टी.आय.चे प्राचार्य सचिन बाविस्कर तसेच अध्यक्षीय भाषण संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश बाविस्कर यांनी करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना गुणपत्रकाचे वाटप करण्यात आले.

यासाठी आय. टी. आय.चे गट निदेशक पराग माळी, किरण माळी, नितीन चव्हाण, जितेंद्र माळी, निलेश माळी यांच्यासह सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. यावेळी शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन बी. हिरे तर आभार महेंद्र चौधरी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here