साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे प्राचार्य पी.एम.कोळी यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी बनवि लेल्या पर्यावरणपूरक गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला आहे. बाप्पाची प्राणप्रतिष्ठा ज्येष्ठ शिक्षकेतर कर्मचारी रामराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. शालेय सांस्कृतिक विभागाचे प्रमुख शरद पाटील यांनी प्राणप्रतिष्ठाचे मंत्रोच्चारण केले. आठवीचे विद्यार्थी दीपक पाटील, रोहित पाटील आणि नयन पाटील यांनी कलाशिक्षिका पी.सी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाडूमातीपासून गणपतीच्या सुबक मूर्त्या बनवून स्थापना केली. सांस्कृतिक मंडळ आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पाची आरास सजविली. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी गणपतीच्या आरतीला उपस्थिती दिली.
Author: Sharad Bhalerao
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार’ देवळी येथील नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचे उपक्रमशिल शिक्षक दादासाहेब रामकृष्ण दाभाडे यांना जळगावच्या प्रथम नागरिक महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. याबद्दल शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी, संचालिका जयश्री सूर्यवंशी तसेच देवळी आश्रमशाळा येथील माध्यमिक मुख्याध्यापक सतिष पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक तुषार खैरनार, अधीक्षक यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.
साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील नूतन मराठा महाविद्यालयात हिंदी भाषा सप्ताहाचे आयोजन केले होते. समारोप सुप्रसिद्ध हिंदी गझल समीक्षक डॉ. मधु खराटे यांच्या उपस्थितीत तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी हिंदी विभाग प्रमुख डॉ. राहुल संदानशिव उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय डॉ.आफाक शेख यांनी करुन दिला तर कार्यक्रमाच्या आयोजनामागील भुमिका डॉ.राहुल संदानशिव यांनी प्रास्ताविकात नमुद केली. अर्जुन परदेशी या विद्यार्थ्यांने आठवड्याभरात झालेल्या वेगवेगळ्या स्पर्धा यांचा आढावा आपल्या मनोगतात व्यक्त केला. आदिती वाणी या विद्यार्थिनीने गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या साहित्यिक मेजवानीचा अनुभव मनोगतातून कथन केला. डॉ.मधू खराटे…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सोमवारी, १८ रोजी आमसभेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा आ.मंगेश चव्हाण होते. यापूर्वी १२ वर्षांपूर्वी ५ मार्च २०११ रोजी शेवटची आमसभा घेण्यात आलेली होती. त्यानंतर आमसभेचे आयोजन करण्यात आले. आमसभेचे सचिव म्हणून गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी जबाबदारी पार पाडली. आमसभेला चाळीसगाव तालुक्यातील हजारो नागरिकांनी उपस्थिती दिली. तसेच आमसभेचे प्रक्षेपण फेसबुक व युट्युबवर लाइव्ह केले होते. प्रक्षेपण राज्यभरात लाखो लोकांनी पाहत आजपर्यंत न बघितलेली आमसभा अनुभवली. आमसभेची प्रस्तावना गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी केली. प्रस्तावनेत त्यांनी आमसभेची पूर्वतयारी, आमसभेचे महत्त्व तसेच चाळीसगावातील आमसभेचा इतिहास, रुपरेषा याबाबत माहिती…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी महावितरणने तंत्रज्ञांच्या केलेल्या प्रशासकीय बदल्या ह्या नियमबाह्य असल्याने महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या कामगारांनी पुन्हा एकदा प्रशासनाविरोधात सोमवारी, १८ सप्टेंबर रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. मागील आंदोलनावेळी दिलेले आश्वासन पाळले न गेल्याने आता कामगारांनी पुन्हा एकदा धरणे धरले. आता बुधवारपासून कार्यालयीन वेळेत सलग तीन दिवस उपोषण केले जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी कामगारांनी घोषणाबाजी करून महावितरण प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला. आता बुधवारी, २० ते २२ सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत सलग तीन दिवस उपोषण केले जाणार असल्याचा इशाराही दिला आहे. त्यानंतर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले जाणार आहे. सोमवारच्या आंदोलनात विभागीय, सर्कल, झोन अशा तिघी कार्यकारिणी पदाधिकारी…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी एरंडोल येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षाच्या आतील कुस्ती स्पर्धेत विजयनाना पाटील आर्मी स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा आठवीचा विद्यार्थी उमेश गणेश पाटील याने ३५ किलो गटात कास्यपदक पटकावले आहे. त्याला क्रीडा शिक्षक विजय बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील तसेच शाळेचे प्राचार्य पी.एम.कोळी, संस्थेचे मानद सचिव सुनील गरुड, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डी.बी.पाटील, श्याम पवार तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांस क्रीडा शिक्षकांचे कौतुक केले आहे.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अवमान केल्याप्रकरणी संबंधित प्रकरणाची पोलीस प्रशासनाच्यावतीने चौकशी करून लालबागचा राजा मित्र मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंहजी देशमुख यांच्याकडे सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा चाळीसगावच्यावतीने सोमवारी, १८ रोजी निवेदनाद्वारे केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येत्या ८ दिवसात चाळीसगाव सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर गणेश पवार, अरुण पाटील, प्रमोद पाटील, श्याम देशमुख, विजय (पप्पू) पाटील,…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी येथील शासकीय औद्योगिक (आयटीआय) संस्थेच्यावतीने आयोजित पीएम ‘रन फॉर स्किल’ मॅरेथॉन स्पर्धा आणि दीक्षांत समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. मॅरेथॉन स्पर्धेत १२६ महिला-पुरूष धावपटूंनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन धरणगाव पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक संतोष पवार, माहिती अधिकार कायदा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, उपप्राचार्य एम.ए.मराठे यांनी झेंडा दाखवत केले. रॅलीचा मार्ग शासकीय आय.टी.आय.पासून ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत तेथून परत आयटीआयपर्यंत होता. शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै-२०२३ च्या पूर्ण संस्थेतून प्रत्येक अभ्यासक्रमात प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘दीक्षांत समारंभ’ कार्यक्रमात अंतिम प्रमाणपत्र व विशेष करंडक देवून गुणगौरव करण्यात आले. पुरुष आणि महिला…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी शहरात मंगळवारी, १९ सप्टेंबरपासून सुरू होणारे गणेशोत्सव, ईद, नवरात्री उत्सव हे सण सर्वांनी शांततेत साजरे करण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर येथील तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्यावतीने तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व समावेशक समाज बांधवांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. बैठकीला तालुक्यासह शहरातील गणेश मंडळांचे प्रतिनिधी, मुस्लीम बांधव, राजकीय संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शासनाच्यावतीने पाचोरा विभागाचे डी.वाय.एस.पी. धनंजय येरुळे, तहसीलदार नानासाहेब आगळे, जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, जामनेर नगर पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक चंद्रकांत भोसले, गटविकास अधिकारी यांचे प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मनोज पाटील, तालुका आरोग्य…
साईमत, धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर येथील झि.तो.महाजन माध्यमिक व ना.भा.पाटील ज्युनियर कॉलेज विद्यालयातून राष्ट्रीय हरित सेना विभागाच्यावतीने पर्यावरण पूरक शाडू मातीपासून गणपती बनविण्याचा उपक्रम प्राचार्य के.एन.जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली हरित सेना शिक्षक देविदास महाजन यांनी आयोजित केला होता. शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी व धानोरा गावाचे नवनिर्वाचित पोलीस पाटील रवींद्र कोळी यांनी दाखविले. हरित सेनेचे शिक्षक देविदास महाजन यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या पर्यावरणास कशा घातक असतात, ते सांगतांना वापरल्या जाणाऱ्या केमिकल युक्त विषारी रंगामुळे नदी, तलाव व इतर ठिकाणच्या पाण्याचे होणाऱ्या प्रदुषणाविषयी माहिती दिली. पर्यावरण पूरक मूर्तीची आवश्यकताविषयी मार्गदर्शन केले. स्वतः तयार करुन नैसर्गिक रंगाने रंगविलेली…