साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार’ देवळी येथील नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचे उपक्रमशिल शिक्षक दादासाहेब रामकृष्ण दाभाडे यांना जळगावच्या प्रथम नागरिक महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
याबद्दल शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी, संचालिका जयश्री सूर्यवंशी तसेच देवळी आश्रमशाळा येथील माध्यमिक मुख्याध्यापक सतिष पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक तुषार खैरनार, अधीक्षक यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.