धरणगावात ‘रन फॉर स्किल’ मॅरेथॉन स्पर्धेसह ‘दीक्षांत समारंभ’ उत्साहात

0
3

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

येथील शासकीय औद्योगिक (आयटीआय) संस्थेच्यावतीने आयोजित पीएम ‘रन फॉर स्किल’ मॅरेथॉन स्पर्धा आणि दीक्षांत समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. मॅरेथॉन स्पर्धेत १२६ महिला-पुरूष धावपटूंनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन धरणगाव पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक संतोष पवार, माहिती अधिकार कायदा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, उपप्राचार्य एम.ए.मराठे यांनी झेंडा दाखवत केले. रॅलीचा मार्ग शासकीय आय.टी.आय.पासून ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत तेथून परत आयटीआयपर्यंत होता.

शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै-२०२३ च्या पूर्ण संस्थेतून प्रत्येक अभ्यासक्रमात प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘दीक्षांत समारंभ’ कार्यक्रमात अंतिम प्रमाणपत्र व विशेष करंडक देवून गुणगौरव करण्यात आले.
पुरुष आणि महिला गटामध्ये प्रथम, द्वितीय, व तृतीय असे तीन क्रमांक काढण्यात आले. पीएम मॅरेथॉन स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय (पुरुष व महिला) विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे रुपये ३ हजार, २ हजार व १ हजाराचा धनादेश व प्रमाणपत्र अप्पर तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे, आरटीआय महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार राजेंद्र वाघ, संस्थेचे प्राचार्य नवनीत चव्हाण, प्रभारी एम.ए.मराठे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी अप्पर तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे, पोलीस निरीक्षक संतोष पवार, माहिती अधिकार कायदा महासंघाचे राजेंद्र वाघ, प्राचार्य नवनीत चव्हाण, प्र.प्रा.एम.ए.मराठे, पो.ना.वैभव बाविस्कर आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दिलीप वाघ, दीपक परदेशी, दीपक नेरकर, संतोष मेढे, शुभांगी पाटील, नंदा कापडे, शिपाई मोरे, चावरे, मेस्को कर्मचारी सतीश पाटील, विठ्ठल पाटील, बागुल दादा, ज्ञानेश्वर मराठे आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्राचार्य नवनीत चव्हाण, सूत्रसंचालन दिलीप वाघ तर आभार उपप्राचार्य एम.ए.मराठे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here