धानोरा विद्यालयात विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून बनविले ‘गणपती’

0
4

साईमत, धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर

येथील झि.तो.महाजन माध्यमिक व ना.भा.पाटील ज्युनियर कॉलेज विद्यालयातून राष्ट्रीय हरित सेना विभागाच्यावतीने पर्यावरण पूरक शाडू मातीपासून गणपती बनविण्याचा उपक्रम प्राचार्य के.एन.जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली हरित सेना शिक्षक देविदास महाजन यांनी आयोजित केला होता. शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी व धानोरा गावाचे नवनिर्वाचित पोलीस पाटील रवींद्र कोळी यांनी दाखविले.

हरित सेनेचे शिक्षक देविदास महाजन यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या पर्यावरणास कशा घातक असतात, ते सांगतांना वापरल्या जाणाऱ्या केमिकल युक्त विषारी रंगामुळे नदी, तलाव व इतर ठिकाणच्या पाण्याचे होणाऱ्या प्रदुषणाविषयी माहिती दिली. पर्यावरण पूरक मूर्तीची आवश्यकताविषयी मार्गदर्शन केले. स्वतः तयार करुन नैसर्गिक रंगाने रंगविलेली मूर्तीची घरी स्थापना करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देणाऱ्या उपक्रमात २७५ विद्यार्थी सहभागी झाले होते. सुंदर, सुबक व पर्यावरणपूरक मूर्ती बनविणाऱ्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना हरित सेना विभागाच्यावतीने बक्षिस दिले जाणार आहे.

उपक्रमाचे अनेकांकडून कौतुक

विद्यालयात १० वीचे विद्यार्थी पोलीस पाटील नवल कोळी यांच्या मदतीने बनविलेली मूर्ती विद्यालयात विराजमान करणार आहेत. याबद्दल विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, प्रायमरीचे चेअरमन जगदीश पाटील, संचालक बी.एस.महाजन, वामनराव महाजन, योगेश पाटील, सागर चौधरी, व्ही.सी.पाटील, अनिल महाजन, प्राचार्य के.एन.जमादार, उपमुख्याध्यापक मोहन चव्हाण, पर्यवेक्षक नवल महाजन, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ यांच्यासह पालकांनी दरवर्षी राबविल्या जाणाऱ्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here