जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आर्मी स्कूलला कास्य पदक

0
3

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

एरंडोल येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षाच्या आतील कुस्ती स्पर्धेत विजयनाना पाटील आर्मी स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा आठवीचा विद्यार्थी उमेश गणेश पाटील याने ३५ किलो गटात कास्यपदक पटकावले आहे. त्याला क्रीडा शिक्षक विजय बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील तसेच शाळेचे प्राचार्य पी.एम.कोळी, संस्थेचे मानद सचिव सुनील गरुड, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डी.बी.पाटील, श्याम पवार तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांस क्रीडा शिक्षकांचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here