Author: Sharad Bhalerao

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे परिसरातील आदिवासी वस्ती येथील रहिवाशांनी उघड्या गटार, नाल्याची तक्रार केली होती. परंतु, आत्ताच तर केले काम, वीस-पंचवीस दिवस झाल्याचे अधिकारी फोनवरती बोलून मोकळे झाले. आधीच नाल्याच्या पाण्याचा त्रास आणि त्यात ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक यांचा होणारा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. यासोबतच रात्री पथदिवेही बंदावस्थेत राहत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे संबंधितांनी या समस्यांकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. पिंपळेमधून शिरसाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूने असलेल्या गटारींवर झाकण नाही. अनेकदा त्यातील घाण पाणी शेजारील घरांमध्ये शिरते. घाणीमुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे परिसरात अनेक नागरिक आजारी पडल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे त्यांचे…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा परिषद जळगावद्वारा आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील माध्यमिक शाळेचे ३२ संघ सहभागी होते. त्यातून द्रौ.रा.कन्या शाळेच्या १४ वर्षाआतील मुली या गटातील संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेते पद मिळविले. उपविजेते पद ग्लोबल इंग्लिश मीडियम शाळेला मिळाले. द्रौ.रा.कन्या शाळेच्या संघाची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. सर्व खेळाडूंचे शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी, पर्यवेक्षक व्ही. एम.पाटील, ज्येष्ठ शिक्षिका एस.पी.बाविस्कर, एस.एस. माळी, करुणा शिक्षक डी.एन.पालवे, पी.व्ही.साबे, बी.एस.पाटील यांनी कौतुक केले आहे. शाळेतील ज्येष्ठ क्रीडा शिक्षिका आर.एस.सोनवणे, क्रीडा शिक्षक जे.व्ही.बाविस्कर यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. स्पर्धेत…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेच्या जळगाव जिल्हा पुनर्गठन कार्यक्रमातंर्गत माध्यमिक शिक्षक पतपेढी, जळगाव येथे जळगाव जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यातील नवनियुक्त तालुकाध्यक्ष व जिल्हा प्रतिनिधींच्या बैठकीत जळगाव जिल्हा कार्यकारिणी निवड प्रक्रियेत डॉ. कुणाल पवार यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. कुणाल पवार हे अमळनेर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत ढेकू खुर्द येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. उर्वरित जिल्हा कार्यकारिणी विस्तार पुढील जिल्हा कार्यकारिणी बैठकीत लवकरच करण्यात येणार आहे. जिल्हा निवड प्रक्रिया राज्य निरीक्षक म्हणून नेमण्यात आलेले राहुल पवार, नंदुरबार यांच्या आणि संघटनेचे राज्यसंघटक संजय सोनार, राज्य सोशल मीडिया प्रमुख विनायक चौथे यांच्या उपस्थित पार पडली. बैठकीत जळगाव…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी येथील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमांतर्गत अमृत कलश संकलन कार्यक्रम नुकताच झाला. उद्घाटन प. रा.हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी यांनी अमृत कलशात एक मूठ माती टाकून केले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष वसंतराव गालापुरे, सचिव डॉ.मिलिंद डहाळे, संचालक अजय पगारिया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण वळवी, उपप्राचार्य प्रा.संदीप पालखे, चोपडा विभागाचे माजी विभागीय समन्वयक डॉ.संजय शिंगाणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.अभिजीत जोशी, डॉ.गौरव महाजन, प्राध्यापक बंधू, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानात रासेयोमध्ये प्रवेशित असलेल्या स्वयंसेवकांनी आपापल्या गावातून एक मूठ माती आणून अमृत कलशात संकलित केली. महाअभियानात…

Read More

साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर येथील झिपरु तोताराम महाजन माध्यमिक व नामदेवराव भावसिंग पाटील ज्युुनियर कॉलेजात विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. इको-फ्रेंडली गणेशाची स्थापना विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, सुवर्णा महाजन यांच्या हस्ते करण्यात आली. विद्यालयात बसविलेल्या शाडू मातीपासून तयार केलेल्या इको-फ्रेंडली गणेशाची निर्मिती विद्यालयातील माजी विद्यार्थी तथा नवनियुक्त पोलीस पाटील रवींद्र कोळी यांनी १० वीच्या विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून मूर्ती बनविण्याचे धडे देत गणेश मूर्ती तयार करण्यास शिकविले. बहुतांश विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून तयार केलेल्या मूर्तींची स्थापना आपल्या घरी केली. विद्यालयातही शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेशाची स्थापना करण्यात आली. याद्वारे विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संदेश देत गणेशाची…

Read More

साईमत, एरंडोल : प्रतिनिधी सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या वृद्धेची मंगलपोत तोडून तिघे आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी अवघ्या चार दिवसात दोघांना अटक करून त्यांच्याकडून मंगल पोत जप्त करून ती वृध्देला परत केली आहे. याबद्दल पोलिसांच्या कामगिरीचे एरंडोल शहरातून कौतुक होत आहे. सविस्तर असे की, पत्रकार विश्वास चौधरी यांच्या काकू विमलबाई लक्ष्मण चौधरी (रा. चौधरी वाडा, एरंडोल) या २४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास विश्रामगृह रस्त्यावरून फिरण्यास जात होत्या. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने धरणगाव रस्ता कुठे आहे, अशी विचारणा करून त्यांच्या गळ्यातील ३५ ग्रॅम वजनाची मंगल पोत तोडून चोरून नेण्याचा प्रयत्न केला. विमलबाई यांच्या हे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील गोराडखेडा येथे एका २६ वर्षीय तरुणाजवळ ५ जिवंत काडतुसासह एक पिस्तूल आढळून आल्याने ऐन गणपती उत्सवाच्या पूर्व संध्येला पाचोरा पोलिसांनी सापळा रचून तरुणास ताब्यात घेतल्याने पुढील होणारा अनर्थ टळला आहे. सविस्तर असे की, गोराडखेडा गावातील गैइबन शहा अलीबाबा दर्ग्याजवळ सोमवारी, १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एक तरुण कमरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची माहिती गुप्त खबऱ्याकडून पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांना मिळाली होती. ही माहिती पो. कॉ. योगेश पाटील यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना दिल्याने त्यांनी लगेचच पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पो. कॉ. योगेश पाटील, राहुल बेहरे, विश्वास देशमुख,…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवत ३० वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, जामनेर तालुक्यातील एका गावात ३० वर्षे महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान चाळीसगाव तालुक्यातील बेलदारवाडी येथील राहणारा दीपक उर्फ किशोर बाळू बेलदार (वय ३०) या तरुणाने महिलेला लग्नाची आमिष दाखविले. त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध करून तिचा विश्वासघात केला. दारू पिऊन तिला शिवीगाळ व मारहाण केल्याचेही समोर आले आहे. हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी दीपक उर्फ किशोर बाळू बेलदार यांच्या…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरासह ग्रामीण भागात मंगळवारी, १९ सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी गणेशाचे जोरदार स्वागत केले. चाळीसगाव शहराचा मानाचा गणपती नेताजी पालकर चौक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाची वाजत-गाजत परंपरेप्रमाणे भव्य मिरवणूक काढून विधीवत स्थापना करण्यात आली. यावेळी घाट रस्त्यावरील जामा मशीदसमोर मुस्लिम बांधवांनी फुलांची उधळण करुन गणपती बाप्पांचे स्वागत केले. येथील नेताजी पालकर चौक गणेशोत्सव मंडळाचा मानाची गणेश मिरवणूक यंदा मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली. मानाचा गणपतीच्या मिरवणुकीत सहभागी अनेक मान्यवरांंनी गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी आ.मंगेश चव्हाण, जिल्हा बँक संचालक प्रदीप देशमुख, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, पोलीस उपअधीक्षक अभयसिंग देशमुख, पोलीस…

Read More

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर येथील प्रसिद्ध उद्योजक तथा श्रीराम ज्येष्ठ नागरिकचे अध्यक्ष शरद कासट यांच्यातर्फे भारतातील प्रसिद्ध मंदिर बालाजी भगवान येथे सालाबादप्रमाणे सात दिवशीय तिरूपती बालाजीची यात्रा काढतात. तसेच पाळधी परिसरातील ८० ते ९० लोकांना दरवर्षी शरदचंद्र कासट नि:शुल्क बालाजी दर्शनासाठी घेऊन जात असतात. यात्रेतील संपूर्ण येण्या-जाण्याचा प्रवास रेल्वेने होतो. तसेच शरद कासट यांच्यामार्फत स्वखर्च करत असतात. सात दिवशीय यात्रेमध्ये तिरूपती बालाजी, पद्मावती, कालहस्ती, सुवर्ण मंदिर, हरे रामा हरे कृष्ण यासारखे आदी तीर्थक्षेत्रांचे दर्शन होत असते. यामध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू अश्ाा तिन्ही राज्यातून ही यात्रा पूर्ण होत असते. यात्रेतील भक्तगणांना त्याचा लाभ मिळत असतो. शरद कासट हे नेहमी धार्मिक…

Read More