धानोरा विद्यालयात ‘इको फ्रेंडली’ गणेशाची स्थापना

0
4

साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर

येथील झिपरु तोताराम महाजन माध्यमिक व नामदेवराव भावसिंग पाटील ज्युुनियर कॉलेजात विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. इको-फ्रेंडली गणेशाची स्थापना विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, सुवर्णा महाजन यांच्या हस्ते करण्यात आली.

विद्यालयात बसविलेल्या शाडू मातीपासून तयार केलेल्या इको-फ्रेंडली गणेशाची निर्मिती विद्यालयातील माजी विद्यार्थी तथा नवनियुक्त पोलीस पाटील रवींद्र कोळी यांनी १० वीच्या विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून मूर्ती बनविण्याचे धडे देत गणेश मूर्ती तयार करण्यास शिकविले. बहुतांश विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून तयार केलेल्या मूर्तींची स्थापना आपल्या घरी केली. विद्यालयातही शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेशाची स्थापना करण्यात आली. याद्वारे विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संदेश देत गणेशाची स्थापना केली.

इको फ्रेंडली गणेशाची स्थापना केल्याबरोबरच विद्यार्थ्यांनी नुकतेच यशस्वीरित्या चंद्रावर लँड झालेल्या चंद्रयान ३ चे हुबेहुब मॉडेल करत विज्ञानाची प्रगती याविषयावर भर देत उत्कृष्ट आरासद्वारे भारताच्या कर्तृत्वाचा संदेश दाखविण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी आपल्या आरसातून व्यक्त केला आहे. यासाठी विद्यार्थ्यांना मातोश्री गँरेजचे संचालक प्रताप महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.

यांची होती उपस्थिती

यावेळी विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, इंग्लिश मेडिअम स्कूलचे चेअरमन जगदीश पाटील, अनंत पाटील, पंकज महाजन, पर्यवेक्षक नवल महाजन, ज्येष्ठ शिक्षक वासुदेव महाजन, व्ही.डी.कोष्टी, एस.सी.पाटील, पूनम पाटील, कुलदीप महाजन, संतोष कोळी, राजेंद्र पाटील, देविदास कोळी यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाडू मातीपासून मूर्ती तयार करणे, आरास चंद्रयान ३ संबंधी सजावटीसाठी दहावीसह सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here