बालाजीहून परतलेल्या पाळधीतील भक्तांचे स्वागत

0
2

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर

येथील प्रसिद्ध उद्योजक तथा श्रीराम ज्येष्ठ नागरिकचे अध्यक्ष शरद कासट यांच्यातर्फे भारतातील प्रसिद्ध मंदिर बालाजी भगवान येथे सालाबादप्रमाणे सात दिवशीय तिरूपती बालाजीची यात्रा काढतात. तसेच पाळधी परिसरातील ८० ते ९० लोकांना दरवर्षी शरदचंद्र कासट नि:शुल्क बालाजी दर्शनासाठी घेऊन जात असतात. यात्रेतील संपूर्ण येण्या-जाण्याचा प्रवास रेल्वेने होतो. तसेच शरद कासट यांच्यामार्फत स्वखर्च करत असतात. सात दिवशीय यात्रेमध्ये तिरूपती बालाजी, पद्मावती, कालहस्ती, सुवर्ण मंदिर, हरे रामा हरे कृष्ण यासारखे आदी तीर्थक्षेत्रांचे दर्शन होत असते. यामध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू अश्ाा तिन्ही राज्यातून ही यात्रा पूर्ण होत असते. यात्रेतील भक्तगणांना त्याचा लाभ मिळत असतो.

शरद कासट हे नेहमी धार्मिक व समाज कार्यात आपले श्रेय देतात. त्यांना अशी आवड असल्याने ते आपले कार्य करतात. गेल्या २६ वर्षापासून त्यांनी ही संकल्पना जोपासली आहे. या यात्रेतील सर्व बालाजी भक्तांना यात्रेचे ओळखपत्र देण्यात येते. यात्रेतील भक्तगणांसाठी तब्येतची काळजी, जेवणासह राहण्याची व्यवस्था यासाठी सर्व भाविकांची काळजी घेतली जाते. यासाठी सोबत डॉक्टरही यात्रेत सहभागी असतो. बालाजी यात्रा पूर्ण करून शरद कासटसह बालाजी भक्तगण दर्शन घेऊन नुकतेच परत आले. तेव्हा त्यांचे भुसावळ रेल्वे स्टेशनवर आगमन झाल्यावर शरद कासट यांच्यासह यात्रेतील बालाजी भक्तांचे स्वागत करण्यात आले. यावेळी साहेबराव भोई, सुकलाल कोळी, संजय महाजन, मुकेश भोई, रवींद्र फुलपगार, तुषार झवर, मनोज पाटील, सुनील राठोड, सोमनाथ माळी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here