Author: Sharad Bhalerao

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील शेतकी संघाच्या १५ जागांसाठी ६२ जणांनी अर्ज दाखल केला होता. त्यात तीन दिवसांपूर्वी माजी आमदार दिलीप वाघ आणि आ.किशोर पाटील यांच्या गटाच्या तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित बारा जागांसाठी २४ तारखेपर्यंत माघारीचा अंतीम दिवस होता. त्यानुसार बुधवारी विरोधात भरलेले अर्ज विरोधी नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी निवडणूक न लावता आपल्या उमेदवारांची माघार घेऊन बिनविरोध करण्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली. त्यामुळे पाचोरा शेतकरी संघाची निवडणूक बिनविरोध करण्याचा दिलेला शब्द दोघांनी खरा करुन दाखविला आहे. याबद्दल दिलीप वाघ आणि आ. किशोर पाटील यांनी त्यांचे आभार मानले. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोघांनी खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक बिनविरोध करून…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी.पी.आर्ट्स, एस.एम.ए. सायन्स अँड के.के.सी. कॉमर्स आणि के.आर.कोतकर ज्युनिअर कॉलेज येथे आझाद हिंद सेनेचे संस्थापक स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे, उपप्राचार्य प्रा. डी. एल. वसईकर, उपप्राचार्य ए. आर. मगर तसेच कार्यालयीन अधीक्षक हिम्मत अंदोरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन, माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. काटे यांनी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा गौरव करून मनोगतात त्यांनी त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.…

Read More

साईमत, रावेर : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ रावेर अंतर्गत बक्षीपूर येथे ‘वखार आपल्या दारी’चा कार्यक्रम मंगळवारी, २३ जानेवारी रोजी राबविण्यात आला. अध्यक्षस्थानी बक्षीपूरचे सरपंच सुनील महाजन होते. कार्यक्रमात प्रगतीशील शेतकरी प्रदीप महाजन, संतोष महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, मुख्य कार्यालय पुणे आणि विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, नाशिकचे रामेंद्रकुमार जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी रावेरचे साठा अधीक्षक डी. ई. घोगले यांनी शेतकऱ्यांनी उतारा दिल्यास ५० टक्के वखार भाड्यात सवलत आणि २५ टक्के आरक्षण, शास्त्रशुद्ध साठवणूक, विमा संरक्षण तसेच ब्लॉकचेनची माहिती व इतर विविध योजनांबद्दल माहिती दिली. यावेळी शेतकरी, ग्रामस्थ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ रावेरचे…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असणाऱ्या हजरत पिर मुसा कादरी उर्फ बामोशी बाबा यांचा उर्स व तलवार शरीफ येत्या गुरुवारी, २५ जानेवारीपासून सुरु होत आहे. यानिमित्त शनिवारी, २७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता तलवार शरीफ मिरवणूक निघेल. यासंदर्भात शहर पोलीस स्टेशनला नुकतीच शांतता कमेटीची बैठक घेण्यात आली. बैठकीला डी.वाय.एस.पी.अभयसिंग देशमुख, उपजिल्हाधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप देशमुख, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, नगरसेवक रामचंद्र जाधव तसेच दर्गा ट्रस्टी मुजावर आणि हिंदू-मुस्लिम बांधव उपस्थित होते. उर्सच्या काळात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असतो. तलवार शरीफ मिरवणुकीत भारताच्या कान्याकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक येतात.

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शेतकरी, कृषी व सामाजिक विषयांवर मंथन होणार आहे. यासह खान्देशी बोलीभाषा व खान्देशचे साहित्यिक वैभव या विषयांवर साहित्य रसिकांना मेजवानी मिळणार आहे. विशेष म्हणजे तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान या विषयालाही हात घालण्यात येणार आहे. ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या संमेलनात अनेक विषयांवर परिसंवाद आयोजित केले आहे. त्यात प्रामुख्याने राजकीय आणि सामाजिक प्रदूषण यावर संत…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी आदिवासी कोळी जमातीच्या लोकांना त्यांच्या संविधानिक न्याय व हक्कांसाठी लढावे लागत आहे. राज्यभर महाआंदोलन अन्नत्याग सत्याग्रह, ठिय्या आंदोलन, साखळी उपोषण, रास्तारोको, ठिय्या धरणे आंदोलन करावे लागत आहे. तरीही शासन प्रशासन याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. जोपर्यंत ह्या लोकांना अनुसूचित जमातीचे जात व वैधता प्रमाणपत्र मिळणार नाही, तोपर्यंत हा लढा दिवसेंदिवस तीव्र होणार आहे. जळगावात अशाच प्रकारे जी. एस. ग्राऊंडवर एकीकडे श्रीरामभक्तांसाठी कथा सुरू आहे तर त्याच ठिकाणी दुसरीकडे महर्षी वाल्मिकी ऋषींच्या वंशजांची व्यथा (उपोषण) सुरू असल्याची खंत आदिवासी कोळी जमातीच्या राज्यव्यापी महाआंदोलनाचे अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर, चोपडा यांनी व्यक्त केली आहे. उपोषणस्थळी उपोषणकर्ते पुंडलिक सोनवणे भोकर, पद्माकर…

Read More

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या स्थापनेनिमित्त झालेल्या भजन संध्येला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी पालकमंत्री यांनीही भजन म्हणून भाविकांचा उत्साह वाढविला. श्रीराम मंदिर स्थापनेनिमित्त येथे पवन झवर आणि विनोद बलदवा यांच्या भजन संध्येचा कार्यक्रम प्रतापराव पाटील, उदय झवर, अमोल कासट, जीपीएस मित्र परिवाराने आयोजित केला होता. यावेळी राम, हनुमान यांचे भजन ऐकून तरुणाई थिरकली तर भजनांना महिला वर्गानेही दाद दिली. कार्यक्रम सुरू असतानाच पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे आगमन झाले आणि भजनाचा आनंद घेता घेता त्यांनाही भजन म्हणण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी ‘रामजी की निकली सवारी रामजी की लीला है न्यारी’ हे भजन म्हटले. त्यांनी गायिलेल्या भजनालाही…

Read More

साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर येथील इकबाल शेख हुसैन मल्टीपर्पज फाउंडेशन संचलित डायमंड शाळेत क्रीडा स्पर्धा नुकत्याच उत्साहात घेण्यात आल्या. त्यात पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. ह्या स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन उत्कृष्ट नियोजन करुन करण्यात आले. अध्यक्षस्थानी डायमंड शाळेचे अध्यक्ष डॉ.हाजी हारूण सेठ होते. यावेळी १०० मीटर धावाच्या स्पर्धेला सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी हिरवा झेंडा दाखविला. तसेच ५० मीटर धावाला फैजपूर येथील सहायक पोलीस निरीक्षक नीलेश वाघ तर मुलींच्या ५० मीटर धाव स्पर्धेला फैजपूर येथील पोलीस उपनिरीक्षक सय्यद मैनुद्दीन यांनी हिरवा झेंडा दाखविला. कबड्डीच्या स्पर्धेसाठी सावदाचे माजी नगरसेवक डॉ.अजित कुमार…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील तहसीलदार कार्यालयावर लालबावटा शेतमजूर युनियन आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीतर्फे मोर्चा काढण्यात आला. यावेळी आताच्या सरकारच्या काळात शेतमजूर, आदिवासी, असंघटित कामगार व दलित यांच्या प्रश्‍नांकडे सरकार लक्ष देत नाही. याकडे सरकारने लक्ष द्यावे म्हणून यापुढे दरमहा शेतमजूर युनियनतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे नेते अमृत महाजन, जिल्हा सचिव वासुदेव कोळी आणि जिजाबाई राणे यांनी केले. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून आदिवासी आणि कष्टकरी लोकांकडे अजिबात लक्ष देत नाही. अदाणी व अंबानी यासारख्या उद्योगपतींकडेच जास्त लक्ष देत आहे. महागाई, बेरोजगारी तसेच महिलांवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. गुजरातमध्ये तर बिल्कीस बानो महिलेवर अत्याचार…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील पी.टी.सी. संचलित श्री. गो.से.हायस्कुल शाळेच्या दर्शनी फलकावर प्रभु ‘श्रीराम’ अवतरले आहे. तब्बल ५०० वर्षानंतर २२ जानेवारी २०२४ ह्या मंगल दिनी रामलल्ला आपल्या मुलस्थानी म्हणजेच अयोध्या नगरीत भव्य अश्‍या, मनमोहक मंदिरात विराजमान झाले आहे. त्यानिमित्त भारतात सर्वदूर आनंदी वातावरण आहे. सर्वांसाठी हा दिवस सर्वात मोठा सण आहे. त्याच मोठ्या सणाचे औचित्य साधून श्री. गो.से.हायस्कुलचे कलाशिक्षक सुबोध मुरलीधर कांतायन यांनी शाळेच्या फलकावर प्रभु ‘श्रीराम’ खडूच्या माध्यमातून चित्र काढले आहे. चित्राचे बारीक निरीक्षण केल्यास त्यात विविध चित्रण आपल्याला दिसून येते. त्यापैकी पहिले म्हणजे चित्रात दोन रामाच्या कलाकृती साकारल्या आहेत. त्यात असे दाखवायचे आहे की, डाव्या बाजूला असलेले राम…

Read More