बक्षीपुरला ‘वखार आपल्या दारी’ कार्यक्रम

0
3

साईमत, रावेर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ रावेर अंतर्गत बक्षीपूर येथे ‘वखार आपल्या दारी’चा कार्यक्रम मंगळवारी, २३ जानेवारी रोजी राबविण्यात आला. अध्यक्षस्थानी बक्षीपूरचे सरपंच सुनील महाजन होते. कार्यक्रमात प्रगतीशील शेतकरी प्रदीप महाजन, संतोष महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, मुख्य कार्यालय पुणे आणि विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, नाशिकचे रामेंद्रकुमार जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी रावेरचे साठा अधीक्षक डी. ई. घोगले यांनी शेतकऱ्यांनी उतारा दिल्यास ५० टक्के वखार भाड्यात सवलत आणि २५ टक्के आरक्षण, शास्त्रशुद्ध साठवणूक, विमा संरक्षण तसेच ब्लॉकचेनची माहिती व इतर विविध योजनांबद्दल माहिती दिली. यावेळी शेतकरी, ग्रामस्थ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ रावेरचे कर्मचारी आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ रावेर येथील भांडारपाल एन .व्ही.महाजन यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here