बामोशी बाबा यांच्या उर्सला २५ जानेवारीपासून प्रारंभ

0
2

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असणाऱ्या हजरत पिर मुसा कादरी उर्फ बामोशी बाबा यांचा उर्स व तलवार शरीफ येत्या गुरुवारी, २५ जानेवारीपासून सुरु होत आहे. यानिमित्त शनिवारी, २७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता तलवार शरीफ मिरवणूक निघेल. यासंदर्भात शहर पोलीस स्टेशनला नुकतीच शांतता कमेटीची बैठक घेण्यात आली.

बैठकीला डी.वाय.एस.पी.अभयसिंग देशमुख, उपजिल्हाधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप देशमुख, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, नगरसेवक रामचंद्र जाधव तसेच दर्गा ट्रस्टी मुजावर आणि हिंदू-मुस्लिम बांधव उपस्थित होते. उर्सच्या काळात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असतो. तलवार शरीफ मिरवणुकीत भारताच्या कान्याकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक येतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here