साईमत, अमळनेर : प्रतिनिधी त्यांची वये अवघे १७ च्या आतील. पण त्यांची वैचारिक पातळी मोठ्यांनाही लाजवेल अशी शिस्त आणि आदर तर कमालीचा ठासून भरलेला. ऐकणारा त्यांच्या तडफदार व स्पष्ट विचारांनी भारावून गेल्याशिवाय राहणार नाही. ते होते आजचे बालसाहित्यिक तर उद्याचे देशाचे भाग्यविधाते. निमित्त होते ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आणि विषय होता बालसाहित्य संमेलनातील कलाआनंद बालमेळाव्याचे. साहित्य संमेलनापूर्वी बालसाहित्यिकांचा गुरुवारी आनंद मेळावा घेण्यात आला. त्यात कथाकथन, काव्यवाचन, बालनाट्य व नाट्यछटा असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. कथाकथन सत्रात ७ विद्यार्थ्यांनी कथाकथन केले. त्यात श्याम अर्थात पांडुरंग सदाशिव साने यांच्या बालपणातील व त्यांच्या आईने त्यांच्यावर केलेल्या संस्कारांना उजळणी दिली. अंघोळ…
Author: Sharad Bhalerao
साईमत, भुसावळ : प्रतिनिधी शासनाने मराठा समाजाला आरक्षणांतर्गत ‘सगेसोयरे’ या धर्तीवर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे २६ जानेवारी २०२४ रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार आश्वासित केले आहे. ‘सगेसोयरे’ व्याख्याबाबत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद भुसावळ तालुक्यातर्फे अध्यादेशाला हरकत नोंदविण्यासाठी गुरुवारी, १ फेब्रुवारी रोजी आ.संजय सावकारे तसेच तहसीलदार शोभा घुले यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष माळी, भारत राष्ट्र समिती पक्षाचे जिल्हा समन्वयक देवेंद्र वराडे, शिवसेना शहरप्रमुख दीपक धांडे, परीट समाज जिल्हाध्यक्ष कैलास शेलोडे, तालुकाध्यक्ष नरेंद्र वाघ, नितीन जाधव, समता परिषदेचे तालुका उपाध्यक्ष संघपाल सपकाळे, शहराध्यक्ष निलेश रायपुरे, तालुका संघटक सविता माळी, दिनेश भंगाळे,…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील कळमसरे येथून जवळील पाडळसरे येथे शुक्रवारी, २ फेब्रुवारी रोजी सालाबादप्रमाणे यावर्षीही मरिआईचा यात्रोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. पाडळसरे येथे अनेक वर्षापासून मरिआईची यात्रा भरावयास प्रारंभ झाला. येथील माजी उपसरपंच भीला साळुंखे आणि ग्रामस्थांच्या मदतीने यात्रा भरावयास सुरुवात केली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पाडळसरेचे नवीन पुनर्वसन म्हणून समायोजन झाले आहे. तापी नदी काठावर वसलेले नाटेश्वर महादेव मंदिर आणि गावात असलेले मरीआई मातेचे मंदिर याच जुन्या गावी स्थित असल्यामुळे आजही यात्रा याच ठिकाणी होत असते, हे विशेष. गावातील इडा, पीडा दूर सारणाऱ्या मरीआईच्या यात्रोत्सवात गावातील महिला, अबालवृद्ध स्वयंस्फूर्तीने सहभागी होतात. गावासह परिसरातील श्रोते यांच्या…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडपात येणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांसमोर गर्दी जमविण्याच्या उद्देशाने प्रशासनातर्फे निवडणुकीचे काम आहे, असे आदेश देवून बीएलओ, महसूल, न.पा.चे कर्मचारी, खासगी शाळेचे कर्मचारी यांना सक्तीने संमेलनस्थळी उपस्थित ठेवून गर्दी जमविण्याचा घाट घातला असल्याचा आरोप विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी कर्मचाऱ्यांना सक्ती न करता त्यांना मनापासून वाटेल त्या ठिकाणी जाऊन साहित्य संमेलनाचा आनंद घेण्याची मुभा द्यावी, असेही आवाहन विद्रोही मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीच्यावतीने केले आहे. संमेलनासाठी गर्दी जमविण्याच्या उद्देशाने विविध शाळेतील शिक्षकांना गाड्या पाठवून विद्यार्थी आणण्याची सक्ती करणे, नगरपरिषद सह स्थानिक स्वराज्य…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील खडकदेवळा येथील माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांकडून विविध कलागुणांची उधळण करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला उपस्थितांनी दाद दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष धैर्यशीलराजे पवार, संस्थेच्या सचिव श्रीमती रूपाली जाधव, विश्वस्त विश्वजीत पवार, विश्वस्त प्रमोद गरूड, मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा सोनवणे यांच्यासह पालक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि विश्वासराव पवार ट्रस्टचे आद्य संस्थापक स्व. श्रीमंत आबासाहेब के.एस.पवार यांच्या प्रतिमांचे पूजन करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन करत सामूहिक नृत्य, वैयक्तिक नृत्य, नाटिका, एकपात्री प्रयोग आणि गीत गायन असे विविध…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से.हायस्कुल येथे इयत्ता सहावीच्या पाठातील ‘मले बाजाराला जायचं बाई’ पथनाट्य पाठात प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे गटारी तुडुंब भरतात, ते खाऊन जनावरे, जलचरे मरतात, शेतात पीक येत नाही ही सत्य परिस्थिती पाठातील स्त्री मांडत आहे. तोच संदर्भ घेऊन सहावीच्या वर्गशिक्षिका, चित्रकला शिक्षिका जे. एन. पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून कापडी पिशव्या, कागदी पिशव्या, विशेषतः टाकाऊपासून टिकाऊ पिशव्या तयार करून घेतल्या. विद्यार्थ्यांना पर्यावरण वाचविण्यासाठी मोलाचा संदेश दिला आहे. विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीचा अनुभव आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका पी.एम.वाघ, उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील, पर्यवेक्षिका अंजली गोहिल, ज्येष्ठ शिक्षक प्रीतमसिंग पाटील, चित्रकला शिक्षक सुबोध कांतायन उपस्थित…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात ‘सगेसोयरे’ शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार आणि २६ जानेवारी २०२४ नुसार मसूदा काढला आहे. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा आहे. त्याचबरोबर शिंदे समिती ही घटनात्मक नसताना शिंदे समितीच्या शिफारसीवरून कुणबी प्रमाणपत्र देणे हे घटनाबाह्य आहे. त्या संदर्भात काही हरकती घेतल्या आहेत. राज्यातील ओबीसी भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण वाचविण्याबाबत अखिल भारतीय समता परिषदेच्या जामनेर शाखेतर्फे गुरुवारी, १ फेबु्रवारी २०२४ रोजी नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अखिल भारतीय समता…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वरखेडे येथे बी. पी. आर्ट्स, एस. एम . ए. सायन्स आणि के.के.सी.कॉमर्स व के.आर.कोतकर महाविद्यालयातर्फे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिर अतिशय उत्साहाच्या वातावरणात सुरू आहे. शिबिरात विद्यार्थ्यांसाठी दररोज अनेक उपक्रमाचे आयोजन केले आहेे. रासेयो शिबिराच्या तिसऱ्या दिवशी वक्तृत्व आणि नृत्य स्पर्धा तसेच चौथ्या दिवशी स्वच्छता अभियान व विद्यार्थ्यांच्या विविध मोफत रक्त चाचण्या करण्यात आल्या. विद्यार्थ्यांसाठी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत सर्वधर्म समभाव, जातीभेद निर्मूलन, स्त्री भ्रूणहत्या या विषयांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी सर्व विषयांवर त्यांचे विचार मांडले. शिबिराला कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. सुनील निकम यांनी भेट देऊन हितगुज केले. विद्यार्थ्यांच्या रासेयोमधील अनुभवाबद्दल त्यांच्याशी चर्चा केली.…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शासनाकडून तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. परंतु शेतकऱ्यांच्या झोळीत सरकारने काय टाकले? अद्याप काहीच नाही. त्यामुळे शासन सुस्तावस्थेत आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळ जाहीर होऊनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. म्हणूनच अखिल भारतीय मराठा महासंघाने त्याची दखल घेत स्थानिक तहसीलदारांना गुरुवारी, १ फेब्रुवारी २०२४ रोजी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, शासनाने चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला आहे. शासनाने आपल्या परिपत्रात शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने चालू वर्षाचे पीक कर्ज, कृषी पंपाच्या चालू बिलात पूर्णतः सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या चालू वर्षाची शालेय फी व इतर कोणतीही फी तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई अनुदान मिळणे आवश्यक होते. परंतु…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शिक्षक, विद्यार्थी, पालक, समाज अशा चौकोनातून कार्य करणारी आणि सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रीडा यांच्या विविधांगी विकासासाठी कार्य करणारी ‘समृद्धी शिक्षक फाउंडेशन’ अशा नोंदणीकृत संस्थेची नुकतीच कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थापक-अध्यक्ष तथा उपक्रमशील शिक्षक सतीश सूर्यवंशी होते. कार्यकारिणीत उपक्रमशील शिक्षकांची निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी संस्थेची ध्येय, उद्दिष्टे, भविष्यातील विद्यार्थी विकासासाठी केल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती सांगून नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी सतीश सतीश सूर्यवंशी, उपाध्यक्ष कामिनी योगेश पाटील, सचिव दिनेश कृष्णाजी चव्हाण, सहसचिव महेंद्र शिवलाल पवार, कोषाध्यक्षा नितादेवी शेषराव चव्हाण, कार्याध्यक्ष चंद्रकांत वसंतराव ठाकरे तर संचालकांमध्ये जामराव नामदेव पाटील, सोमनाथ…