साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
शासनाने मराठा समाजाला आरक्षणांतर्गत ‘सगेसोयरे’ या धर्तीवर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे २६ जानेवारी २०२४ रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार आश्वासित केले आहे. ‘सगेसोयरे’ व्याख्याबाबत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद भुसावळ तालुक्यातर्फे अध्यादेशाला हरकत नोंदविण्यासाठी गुरुवारी, १ फेब्रुवारी रोजी आ.संजय सावकारे तसेच तहसीलदार शोभा घुले यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनावर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष माळी, भारत राष्ट्र समिती पक्षाचे जिल्हा समन्वयक देवेंद्र वराडे, शिवसेना शहरप्रमुख दीपक धांडे, परीट समाज जिल्हाध्यक्ष कैलास शेलोडे, तालुकाध्यक्ष नरेंद्र वाघ, नितीन जाधव, समता परिषदेचे तालुका उपाध्यक्ष संघपाल सपकाळे, शहराध्यक्ष निलेश रायपुरे, तालुका संघटक सविता माळी, दिनेश भंगाळे, सोमा बराटे, गणेश माळी, शीतल माळी, निलेश कोलते, ज्ञानेश कोल्हे, सोमेश पाटील, निर्मला जोहरे, सरुबाई वाघमारे, कलाबाई माळी, सुमन भोई आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.