वरखेडेला रासेयोच्या शिबिरात ग्राम स्वच्छतेसह अंधश्रद्धा निर्मूलन अभियान

0
3

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील वरखेडे येथे बी. पी. आर्ट्स, एस. एम . ए. सायन्स आणि के.के.सी.कॉमर्स व के.आर.कोतकर महाविद्यालयातर्फे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिर अतिशय उत्साहाच्या वातावरणात सुरू आहे. शिबिरात विद्यार्थ्यांसाठी दररोज अनेक उपक्रमाचे आयोजन केले आहेे. रासेयो शिबिराच्या तिसऱ्या दिवशी वक्तृत्व आणि नृत्य स्पर्धा तसेच चौथ्या दिवशी स्वच्छता अभियान व विद्यार्थ्यांच्या विविध मोफत रक्त चाचण्या करण्यात आल्या.

विद्यार्थ्यांसाठी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत सर्वधर्म समभाव, जातीभेद निर्मूलन, स्त्री भ्रूणहत्या या विषयांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी सर्व विषयांवर त्यांचे विचार मांडले. शिबिराला कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. सुनील निकम यांनी भेट देऊन हितगुज केले. विद्यार्थ्यांच्या रासेयोमधील अनुभवाबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. विद्यार्थ्यांना दररोज श्रमदान करावे लागते. त्यामधून आज विद्यार्थ्यांनी वरखेड गावची स्मशानभूमीसहित संपूर्ण स्वच्छता केली. विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेचे तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे दिले. विद्यार्थ्यांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.

यशस्वीतेसाठी ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी नामदेव अहिरे, श्री.महाले, श्री.केदार यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा. आर.आर. बोरसे, प्रा.दीपक पाटील, प्रा. पंकज वाघमारे, प्रा. रवींद्र पाटील, प्रा. डॉ. दीपाली बंस्वल, प्रा. भारती महाले, महाविद्यालयाचे रासेयोमध्ये घडलेले स्वयंसेवक विद्यार्थी आविष्कार जाधव, अमोल खैरे, दीपक चव्हाण, मोनिका पाटील यांनी स्वयंसेवक विद्यार्थांना मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here