Author: Sharad Bhalerao

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाअंतर्गत लोहारा येथील डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववी सेमीच्या विद्यार्थ्यांकडून निवडणूक प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम नुकताच राबविण्यात आला. उपक्रमात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. आपण स्वतः मतदान करीत असल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले यांनी विद्यार्थ्यांना निवडणूक उपक्रम सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मतमोजणीपर्यंत निवडणूक प्रक्रिया कशाप्रकारे राबविली जाते, त्याची माहिती विशद केली. निवडणूक आयुक्त कशाप्रकारे निवडणूक जाहीर करतात. तसेच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची कामे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. नंतर विद्यार्थ्यांमधूनच उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले. त्यानंतर त्या अर्जांची छाननी करण्यात येऊन उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले. नंतर निवडणूक तारीख जाहीर करण्यात…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्यावतीने ‘न्यू होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याला हजारो महिलांनी स्वयंस्फूर्तीने हजेरी लावून कार्यक्रमाचा आनंद लुटला. याप्रसंगी विविध गाण्यांसह स्पर्धांमधून पाचोरा-भडगाव मतदारसंघातील परिवर्तनाचा नारा बुलंद करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रधार क्रांतीनाना व त्यांची कन्या सह्याद्री यांनी सादर केलेल्या ‘शिवसेनेची मशाल निशाणी ठेवा लक्षात…वैशालीताईना पाठवा तुम्ही विधानभवनात’ गाण्याला महिलांकडून जोरदार दाद मिळाली. पाचोरा येथील माताश्री कैलादेवी मंदिरा शेजारी ‘न्यू होम मिनिस्टर’ खेळ पैठणीच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रारंभी सिने बाल कलाकार सह्याद्री मळेगावकर हिने कार्यक्रमाची सुरूवात केली. याप्रसंगी वैशाली सूर्यवंशी यांचे जोरदार जयघोष आणि उर्जावान संगीताचा ताल सुरू असतांना हजारो महिलांच्या…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे जळगावहून भुसावळमार्गे किंवा किनगावमार्गे आले तरी दोन्ही बाजूने यावल शहरात प्रवेश करताना बोरावल दरवाजापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील यावल-भुसावळ रस्त्याच्या वळणावर आणि महाराणा प्रतापनगरमधून नगरपालिकेत नदीपात्रातील रस्त्यावरून येताना नगरपालिका कार्यालयापासून १०० ते २०० मीटर अंतरावर हरिता-सरिता नदी पात्रात महास्वच्छता अभियानाचा ‘फियास्को’ यावल नगरपालिकेने कसा केला आणि नगरपालिकेच्या ‘दिव्याखाली अंधार’ कसा आहे हे प्रत्यक्ष दिसून आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शहराची पाहणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. महाराष्ट्र शासन नगर विकास विभागातर्फे १२ जानेवारी २०२४ पासून स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. त्यावर शासनाने जनजागृतीसाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च जाहिरातीच्या माध्यमातून केला आहे. सर्वेक्षण…

Read More

साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर गोवा (पणजी) येथे नुकतीच राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा घेण्यात आली. त्यात जामनेरातील लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कुलच्या विविध वयोगटातील स्पर्धेत सहा विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करुन दुहेरी यश संपादन केले आहे. तसेच श्रीलंकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी मजल मारली आहे. त्यात पहूरच्या अर्णव जोशीने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये भुसावळ येथे जिल्हा व राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सहा विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केल्याने राष्ट्रीय पातळीवर त्यांची निवड झाली होती. २८ रोजी रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया व रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, रिले स्केटिंग चषक गोवा यांच्यावतीने मिनिस्टरी ऑफ युथ ॲफीएरस ॲण्ड स्पोर्ट्स मिरामर,…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील अंशतः अनुदानित संघटना यांच्यावतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना राज्यातील अंशतः अनुदानित बांधव १३ जानेवारी २०२४ पासून आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसले आहेत. हक्काचा १०० टक्के पगार मिळावा आणि १ जानेवारी २०२४ पासून पुढील वाढीव टप्पा मिळावा, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी मुंदडा फाउंडेशन, अमळनेर येथील पी.एस.विंचूरकर, गोकुळ पाटील, प्रदीप चौधरी, बी.बी.पाटील, डी.बी.पाटील, रुपाली भामरे, संगीता बाविस्कर, मनीषा पवार, स्वाती बोरसे, राहुल महाजन, राहुल पाटील, प्रकाश पाटील, दीपक पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी साहित्य समाजाचा आरसा आहे. राज्य घटनेत प्रत्येकाला समान हक्क व संधी प्रदान केले आहेत. असे असतांना मराठी साहित्यात तृतीयपंथीय समुदायाचे चित्रण दिसून येत नाही. तसेच तृतीयपंथीयांना समान वागणूक मिळत नाहीत. तेव्हा मराठी साहित्यिक व लेखकांनी तृतीयपंथीय, पारलिंगी समुदायाच्या दु:ख, व्यथा, वेदना, समस्या जाणून घेऊन साहित्यात चित्रण करावे, असा आशावाद ‘तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान’ विषयावरील परिसंवादात सहभागी वक्त्यांनी व्यक्त केला. भारत निवडणूक आयोगाच्या अधीनस्त कार्यरत महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात ‘तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान’ विषयावर परिसंवाद आयोजित केला होता.…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील शनिवारीपासून होत असलेल्या अठराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.वासुदेव मुलाटे यांचे अमळनेरमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीच्या प्रवेशद्वारावर महिला ढोल पथकाने ढोल ताशांच्या गजरात महामानवांच्या जयघोषात अभिनव पद्धतीने जंगी स्वागत केले. अमळनेरच्या विद्रोही साहित्य संमेलन समितीने आणि महिला ढोल पथकाने केलेल्या स्वागताने सर्वच भारावून गेलेले आहे. अमळनेरचे विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे ऐतिहासिक दृष्ट्या यशस्वी ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला. आर.के.नगर, धुळे रोड येथे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत नियोजित अध्यक्ष डॉ.वासुदेव मुलाटे यांचे आगमन होताच विद्रोही साहित्य संमेलन संयोजन समितीतर्फे अभिनव पद्धतीने महिलांच्या ढोल पथकाद्वारे स्वागत करण्यात आले.…

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी मलकापूर दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या प्रयत्नामुळे देवधाबा येथील २३ दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायतीकडून पाच टक्के अतिरिक्त दिव्यांग निधी मिळाला. शासनाकडून दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी या बाबीपासून अनभिज्ञ असल्यामुळे देवधाबा येथील ६० ते ६५ दिव्यांग बांधव शासनाच्या पाच टक्के अतिरिक्त निधीपासून वंचित होते. दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश मिळाल्यामुळे निधी मिळाला आहे. या बाबींची दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष नागेश सुरंगे यांना जाणीव होताच त्यांनी याप्रकरणी लक्ष केंद्रित केले. दिव्यांग बांधव वंचित का? यासंदर्भात त्यांनी स्थानिक ग्रामसेवकांना जाब विचारला. त्याचप्रमाणे शासनाचा अतिरिक्त ५ टक्के निधी दिव्यांग बांधवांना मिळाला पाहिजे या प्रामाणिक हेतूतून ग्रामसेवकाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. परिणामतः…

Read More

साईमत, बोदवड : प्रतिनिधी लोकमत कॅम्पस आणि जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत महागेम्स २०२४’ कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना महागेम्सच्या माध्यमातून नव्याने व्यासपीठ मिळाले. तायक्वांदो स्पर्धेत बोदवड येथील न.ह.रांका हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील श्रावण बडगुजर, राजरत्न गायकवाड, सोहम कोल्हे आणि दिग्विजय पाटील हे चार खेळाडू कांस्यपदकाचे मानकरी ठरले. त्यांना एस.ए.तायडे, आर.एस.जैस्वाल, भूषण भोई, गिरीश खोडके यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचा शाळेचे मुख्याध्यापक पी.एम.पाटील, उपमुख्याध्यापिका मीना बडगुजर, पर्यवेक्षक आर.के.तायडे, जे.एन.माळी, उपप्राचार्य मीना नेमाडे, क्रीडा प्रमुख डॉ.संजय निकम यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मिठूलाल अग्रवाल, उपाध्यक्ष अजय जैन, सचिव विकास कोटेचा,…

Read More

साईमत, बोदवड : प्रतिनिधी येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या विशेष हिवाळी शिबिराचा दत्तक गाव हिंगणे येथे नुकताच समारोप करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव विकास कोटेचा होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिंगणे येथील सरपंच मनिषा रामराव पाटील, संस्थेचे संचालक रवींद्र माटे, आनंद जैस्वाल, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.व्ही. पी. चौधरी उपस्थित होते. सात दिवस चाललेल्या शिबिरात रा. से. यो.च्या स्वयंसेवकांनी गावाशेजारील नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण केले. गावासह शाळेच्या परिसराची स्वच्छता करून गावातील लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला. स्वच्छता, पर्यावरण व ग्रंथ दिंडीमध्ये पथनाट्य व घोषवाक्य यांच्या माध्यमातून विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली. शिबिरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण…

Read More