बोदवडच्या रांका विद्यालयाचे तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यश

0
26

साईमत, बोदवड : प्रतिनिधी

लोकमत कॅम्पस आणि जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत महागेम्स २०२४’ कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना महागेम्सच्या माध्यमातून नव्याने व्यासपीठ मिळाले. तायक्वांदो स्पर्धेत बोदवड येथील न.ह.रांका हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील श्रावण बडगुजर, राजरत्न गायकवाड, सोहम कोल्हे आणि दिग्विजय पाटील हे चार खेळाडू कांस्यपदकाचे मानकरी ठरले. त्यांना एस.ए.तायडे, आर.एस.जैस्वाल, भूषण भोई, गिरीश खोडके यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी खेळाडूंचा शाळेचे मुख्याध्यापक पी.एम.पाटील, उपमुख्याध्यापिका मीना बडगुजर, पर्यवेक्षक आर.के.तायडे, जे.एन.माळी, उपप्राचार्य मीना नेमाडे, क्रीडा प्रमुख डॉ.संजय निकम यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मिठूलाल अग्रवाल, उपाध्यक्ष अजय जैन, सचिव विकास कोटेचा, माजी अध्यक्ष तथा संचालक ॲड.प्रकाशचंद्र सुराणा यांच्यासह सर्व संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here