देवधाबातील २३ दिव्यांगांना मिळाला पाच टक्के अतिरिक्त निधी

0
4

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

मलकापूर दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या प्रयत्नामुळे देवधाबा येथील २३ दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायतीकडून पाच टक्के अतिरिक्त दिव्यांग निधी मिळाला. शासनाकडून दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी या बाबीपासून अनभिज्ञ असल्यामुळे देवधाबा येथील ६० ते ६५ दिव्यांग बांधव शासनाच्या पाच टक्के अतिरिक्त निधीपासून वंचित होते. दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश मिळाल्यामुळे निधी मिळाला आहे.

या बाबींची दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष नागेश सुरंगे यांना जाणीव होताच त्यांनी याप्रकरणी लक्ष केंद्रित केले. दिव्यांग बांधव वंचित का? यासंदर्भात त्यांनी स्थानिक ग्रामसेवकांना जाब विचारला. त्याचप्रमाणे शासनाचा अतिरिक्त ५ टक्के निधी दिव्यांग बांधवांना मिळाला पाहिजे या प्रामाणिक हेतूतून ग्रामसेवकाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. परिणामतः ग्रामपंचायतीच्यावतीने २३ दिव्यांग बांधवांना प्रति दिव्यांग १ हजार ५०० रुपये याप्रमाणे वितरित केला आहे.

हा निधी देवधाबाचे सरपंच देवकुमार सोळंके, ग्रामपंचायतीचे सचिव दीपक ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते वाटप करण्यात आला. एकंदर दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या प्रयत्नामुळे दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काचा अतिरिक्त पाच टक्के निधी प्राप्त झाला आहे. दिव्यांग निधी मिळवून दिल्याबद्दल दिव्यांग बांधवांकडून दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here