अंशतः अनुदानित संघटनांनी संमेलनानिमित्त आलेल्या उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना दिले निवेदन

0
1

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील अंशतः अनुदानित संघटना यांच्यावतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना राज्यातील अंशतः अनुदानित बांधव १३ जानेवारी २०२४ पासून आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसले आहेत. हक्काचा १०० टक्के पगार मिळावा आणि १ जानेवारी २०२४ पासून पुढील वाढीव टप्पा मिळावा, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी मुंदडा फाउंडेशन, अमळनेर येथील पी.एस.विंचूरकर, गोकुळ पाटील, प्रदीप चौधरी, बी.बी.पाटील, डी.बी.पाटील, रुपाली भामरे, संगीता बाविस्कर, मनीषा पवार, स्वाती बोरसे, राहुल महाजन, राहुल पाटील, प्रकाश पाटील, दीपक पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here