साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील ‘चोपडा टॅलेंट हंट’ आयोजन समितीमार्फत आयोजित ‘चोपडा टॅलेंट हंट’ म्हणजेच ‘सीटीएच’ परीक्षेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता पहिली, चवथी आणि सातवीच्या विद्यार्थांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत तब्बल १ हजार ३२४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ही परीक्षा ४ फेब्रुवारी रोजी पंकज विद्यालय याठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. चोपडा तालुक्यातील स्टेट बोर्ड तसेच सीबीएसई माध्यमाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग नोंदविला. परीक्षेसाठी मोठी आकर्षक बक्षिसे विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आले होते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे विद्यार्थ्यांना स्पर्धा युगाची ओढ लागणे तसेच स्पर्धेच्या युगात त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज करणे होय. परीक्षा स्थळी पंकज ग्लोबल पब्लिक स्कुलचे मुख्याध्यापक मिलिंद पाटील आणि विवेकानंद…
Author: Sharad Bhalerao
साईमत, जळगाव : प्रतिनिधी त्यागमूर्ती माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त सोनीनगर सावखेडा रोड, पिंप्राळा परिसरातील महागौतमी महिला संघ यांच्या विद्यमाने माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सुमित्र अहिरे, बाबुराव पानपाटील, नरेश बागडे, अजय बागडे, प्रकाश जाधव, विनोद लोखंडे, विनोद निकम, आकाश सोनवणे, सागर सुरवडकर, यशवंत पाटील, सरदार राजपूत, नारायण येवले, देविदास पाटील, गौतमी महिला संघाच्या अध्यक्षा संगिता भालेराव, ज्योती निकम, योगिता पाटील, संगिता कोळी, सुनिता राजपूत, सिंधुताई जाधव, भारती जाधव, पूनम जाधव, वंदना बांगर, मंगला सोनवणे, मिना हिवाळे, सोनाली सोनवणे, श्रीमती अहिरे, श्रीमती लोखंडे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
साईमत, यावल : प्रतिनिधी गेल्या साडेतीन दशकापासून यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ हा संचालक मंडळाच्या माध्यमातून भा.रा.काँ.च्या ताब्यात होता. गेल्या २० वर्षात संचालक मंडळात काँग्रेसचे वर्चस्व असल्याने याठिकाणी भा.रा.काँ.चे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्या माध्यमातून तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे कार्यालय, सभागृह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी तसेच विविध कार्यक्रमासाठी संपर्क कार्यालय झालेले होते. परंतु नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत १७ पैकी १६ जागांवर भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजितदादा गट), रिपाई (आठवले गट) पुरस्कृत सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहेे. त्यामुळे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संपर्क कार्यालयावर ५ फेबु्रवारी २०२४ पासून भाजपाने लोकशाही मार्गाने ताबा मिळविल्याचे…
साईमत, यावल : प्रतिनिधी येथील नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहरातील गाळ कचरा, डेब्रिज वाहतूक व द्वार ते द्वार कचरा संकलन कामाचे डिसेंबर २०२३ देयक अदा करण्याची ९ जानेवारी २०२४ रोजी केलेली टिपणी क्र.१० प्रत्यक्ष बघितल्यावर पुणे येथील ‘दिशा’ एजन्सीला यावल नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी १४ लाख ६२ हजार ३८९ रुपये देयक दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत संपूर्ण यावल शहरातील राजकारण, ठेकेदारी वर्गातून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावल नगर परिषदेने ९ जानेवारी २०२४ रोजी टिपणी क्र.१० मध्ये नमूद केले आहे की, यावल नगर परिषदेने सर्वसाधारण सभा ठराव क्र.१०७६ ३ ऑगस्ट २०२१ अन्वये घनकचरा व्यवस्थापन नियम २००० व २०१६ मधील तरतूदीनुसार…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीद्वारा संचलित डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयात शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेच्यावतीने नवीन स्थानिक सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात आली. याबद्दल विद्यालयाच्यावतीने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हा.चेअरमन भीमराव शेळके होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सहसचिव यु.यु.पाटील होते. यावेळी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून कृषीभूषण विश्वासराव पाटील, उपाध्यक्ष म्हणून ए.ए. पटेल यांची निवड करण्यात आली. सदस्यांमध्ये डिगंबर नथ्थू चौधरी, शिवराम रामचंद्र भडके, उत्तमराव वेडूजी शेळके, डॉ. देवेंद्र भीमराव शेळके, सुरेश गरबड चौधरी, गोविंदराव दौलतराव देशमुख, दत्तात्रय भिका माळी, विजय श्रीकृष्ण पालीवाल, सुनील क्षीरसागर यांचा समावेश आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांचा विद्यालय आणि शेंदुर्णी…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी लोकशाहीचा नारा देत राज्यघटनेविषयी आदर दाखवून उठता बसता शाहु-फुले आंबेडकरांचे नाव घेत आणि राज्यघटना व लोकशाहीच्या नावाने गजर करत राजकारण करणाऱ्या शरद पवार यांच्या बेगडी लोकशाही प्रेमाचा, एकाधिकारशाही राजकारणाचा बुरखा निवडणूक आयोगाने उतरविला आहे. एका व्यक्तीच्या दावणीला बांधलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची घराणेशाहीच्या राजकारणातून मुक्तता केली आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खा.उन्मेश पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. घटना बासनात बांधून व पक्षाची ध्येयधोरणे मर्जीनुसार राबवून पक्षावर एकहाती वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या शरद पवार यांच्या कारभारावर आयोगाने प्रकाशझोत टाकल्यामुळे पवार यांचे लोकशाहीप्रेम व राज्यघटनेचा आदर बेगडी असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीकाही…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील ग्रामपंचायतीचे सरपंच अक्षय जैस्वाल यांनी २०२१-२२ दिव्यांग कल्याण निधी ५ टक्के मध्ये अनियमितता करीत घोळ केल्याच्या कारणावरून नाशिक विभागीय आयुक्त यांनी ठपका ठेवत त्यांना ६ फेब्रुवारीपासून अपात्र ठरविले आहे. नाशिक आयुक्तांच्या दणक्याने लोहाऱ्याचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. दरम्यान, अक्षय जैस्वाल यांनी सदस्यांसह ३० जानेवारी रोजी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांनी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी प्रवेश घेतल्याची चर्चा होती. मात्र, त्यांचा भाजपात प्रवेश ७ दिवसांपूर्वी होऊनही कारवाई झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. जैस्वाल यांना अपात्र ठरविल्यानंतर दिव्यांग एकता संघटनेने फटाके फोडून आनंद साजरा केला आहे. दिव्यांग एकता बहुउद्देशीय संस्थेचे विकास शिवदे, उपाध्यक्ष सुरेश पाटील…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथे भैरवनाथ महाराजांचे जागृत देवस्थान आहे. याठिकाणी तब्बल महिनाभर यात्रा भरत असते. जळगाव जिल्ह्यातून भाविक भक्त यात्रेला येतात. याठिकाणी यात्रेत वेगवेगळ्या दुकानांचे स्टॉलही लावलेले असतात. त्यामुळे पाण्याच्या बॉटल्स, प्लास्टिक कचरा, कागद, नारळाचे टरफले त्याठिकाणी पडून असतात. यात्रा झाल्यानंतर परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच रस्त्यावरून माणुसकी रुग्णसेवा समुहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांच्या नजरेस हे दृश्य पडले. त्यांनी त्याच दिवशी तात्काळ सावखेडा बुद्रुक, सावखेडा खुर्द आणि राजुरा येथील जिल्हा परिषद शाळेत भेटी दिल्या. शाळेला मंदिराचा परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली. त्यांच्या निस्वार्थी सेवेला सर्व तिन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावरील झालेल्या गोळीबार प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपींनी वापरलेली कार बेवारस सापडली आहे. कारमधून आलेल्या पाच जणांनी भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्याची खळबळजनक घटना बुधवारी, ७ फेब्रुवारी रोजी दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनी परिसरात घडली होती. त्यात बाळू मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले आहे. चाळीसगाव शहराला दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याकामी स्वतः…
साईमत, बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय विकलांग पार्टीच्यावतीने तहसील कार्यालयावर मंगळवारी रोजी सकाळी १२ वाजता मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार अनिल वाणी उपस्थित नसल्याने हे निवेदन पुरवठा निरीक्षक एम.एफ.तडवी यांनी स्वीकारले. दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या पाच टक्के राखीव निधीच्या अर्जाचे वितरणही करण्यात आले. शासकीय निकर्षानुसार चाळीस टक्क्यावर दिव्यांग असलेल्या बांधवांना कोणत्याही अटी शर्ती विना सरळ अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत, नगरपंचायत क्षेत्रात दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला पाच टक्के निधी त्वरित त्यांना मिळावा, त्याचप्रमाणे राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी ग्रामपंचायत स्तरावर शासनाने वेगळ्या निधीची तरतूद करावी अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले. यावेळी दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष धनराज…