लोहाऱ्यातील विद्यालयात नूतन स्थानिक सल्लागार समितीचा सत्कार

0
2

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीद्वारा संचलित डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयात शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेच्यावतीने नवीन स्थानिक सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात आली. याबद्दल विद्यालयाच्यावतीने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हा.चेअरमन भीमराव शेळके होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सहसचिव यु.यु.पाटील होते.

यावेळी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून कृषीभूषण विश्‍वासराव पाटील, उपाध्यक्ष म्हणून ए.ए. पटेल यांची निवड करण्यात आली. सदस्यांमध्ये डिगंबर नथ्थू चौधरी, शिवराम रामचंद्र भडके, उत्तमराव वेडूजी शेळके, डॉ. देवेंद्र भीमराव शेळके, सुरेश गरबड चौधरी, गोविंदराव दौलतराव देशमुख, दत्तात्रय भिका माळी, विजय श्रीकृष्ण पालीवाल, सुनील क्षीरसागर यांचा समावेश आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांचा विद्यालय आणि शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

नवीन स्थानिक सल्लागार समितीच्यावतीने विद्यालयाला जाळीची कंपाउंड वॉल करण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन संस्थेचे सहसचिव यु.यु.पाटील, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष विश्‍वासराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष यांनी विद्यालयाला अब्राहम लिंकन यांचे हेडमास्तरास पत्र सप्रेम भेट दिले. त्याचे वाचन विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक वाय.पी.वानखेडे यांनी केले. त्याविषयी विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली. संस्थेचे सहसचिव यु.यु.पाटील यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या शैक्षणिक कार्याविषयीची माहिती दिली.

विश्‍वासराव पाटील यांनी मनोगत व्यक्त करून सत्यनिष्ठा प्रामाणिक कार्यास महत्त्व दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव शेळके यांनी मनोगतातून शाळेच्या शैक्षणिक वाटचालीविषयी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले, उपमुख्याध्यापिका यु.डी.शेळके, पर्यवेक्षक व्ही.एम.शिरपुरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले, सूत्रसंचालन तथा आभार बी.एन.पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here