साईमत, जळगाव : प्रतिनिधी
त्यागमूर्ती माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त सोनीनगर सावखेडा रोड, पिंप्राळा परिसरातील महागौतमी महिला संघ यांच्या विद्यमाने माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सुमित्र अहिरे, बाबुराव पानपाटील, नरेश बागडे, अजय बागडे, प्रकाश जाधव, विनोद लोखंडे, विनोद निकम, आकाश सोनवणे, सागर सुरवडकर, यशवंत पाटील, सरदार राजपूत, नारायण येवले, देविदास पाटील, गौतमी महिला संघाच्या अध्यक्षा संगिता भालेराव, ज्योती निकम, योगिता पाटील, संगिता कोळी, सुनिता राजपूत, सिंधुताई जाधव, भारती जाधव, पूनम जाधव, वंदना बांगर, मंगला सोनवणे, मिना हिवाळे, सोनाली सोनवणे, श्रीमती अहिरे, श्रीमती लोखंडे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.