यावलला कचरा संकलनाच्या कामाचे १४ लाखाचे देयक पुण्यातील ‘दिशा’ एजन्सीला

0
4

साईमत, यावल : प्रतिनिधी

येथील नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहरातील गाळ कचरा, डेब्रिज वाहतूक व द्वार ते द्वार कचरा संकलन कामाचे डिसेंबर २०२३ देयक अदा करण्याची ९ जानेवारी २०२४ रोजी केलेली टिपणी क्र.१० प्रत्यक्ष बघितल्यावर पुणे येथील ‘दिशा’ एजन्सीला यावल नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी १४ लाख ६२ हजार ३८९ रुपये देयक दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत संपूर्ण यावल शहरातील राजकारण, ठेकेदारी वर्गातून अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

यावल नगर परिषदेने ९ जानेवारी २०२४ रोजी टिपणी क्र.१० मध्ये नमूद केले आहे की, यावल नगर परिषदेने सर्वसाधारण सभा ठराव क्र.१०७६ ३ ऑगस्ट २०२१ अन्वये घनकचरा व्यवस्थापन नियम २००० व २०१६ मधील तरतूदीनुसार द्वारस्तर कचरा संकलन व वाहतूक व्यावसायिक, वाणिज्य, व्यापारी क्षेत्र व रस्त्यालगतच्या सार्वजनिक ठिकाणचा कचरा संकलन वाहतूक करणे, रस्ते व व्यापारी, व्यावसायिक, सार्वजनिक क्षेत्राची साफ सफाई करणे, शहरातील गटारींची स्वच्छता करणे, शहरातील मृत जनावरे उचलणे व शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे, घनकचरा प्रक्रिया प्रकल्प येथे नवीन कचरा आधारावर प्रकल्प चालविणे, खत प्रकल्प चालविणे, अनुषंगिक कामे करणे आदी कामांसाठी जाहीर ई-निविदा टेंडर आप डी.२०२१.डी. एम.ए. ७३८७२७१ (द्वितीय वेळ) प्रसारित करून संदर्भ ९ नुसार १ मार्च २०२२ पासून कार्यादेशित केले होते. सादर त्रैवार्षिक निविदेसाठी १ वर्षाच्या कालावधीकरीता प्रशासकीय मान्यता संदर्भ ८ अन्वये प्रदान केली होती. तदनंतर मार्च २०२३ पासून १ वर्ष कालावधीकरीता संदर्भ ११ अन्वये १४ व १५ वा वित्त आयोग निधी अंतगर्त प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार मक्तेदारास प्रथम वर्षाकरीता संदर्भ ९ नुसार कार्यादेशित आहेे. तसेच संदर्भ १२ नुसार मक्तेदारास प्राप्त प्र. मा. नुसार मार्च २०२३ पासून पुढील एक वर्षासाठी कार्यादेशित केले आहे. मक्तेदाराने केलेल्या कामाचे मागणी बिल १३ अन्वये सादर केले असून तपासणीअंती देयक भाग १ (नगर परिषदेने मक्तेदारास ११ जानेवारी २०२४ रोजी नमुना क्र. ६४ नुसार अदा करावयाचे देयक) १४ लाख ६२ हजार ३८९ रुपये मंजूर केले आहे.

यावल नगरपरिषद नमुना क्र.६४ प्रत्यक्ष बघितला असता यावल नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहरातील गाळ कचरा, डेबीज वाहतूक व द्वार ते द्वार कचरा संकलन वाणिज्यिक द्वार ते द्वार कचरा संकलन गटारी सफाई दिवस रात्री झाडझुड करणे कामाचे डिसेंबर २०२३ बिल १४ लाख ६२ हजार ३८९ रुपये मागणी बिल सादर केले असल्याचे नगरपालिकेत ९ जानेवारी २०२४ रोजी नोंदविण्यात आले आहे. कामाचे मागणी बिल ठेकेदाराने सादर केल्यानंतर आणि ठेकेदाराने यावल शहरात दैनंदिन कामकाज अटी शर्तीनुसार केले आहे किंवा नाही याची खात्री यावल नगरपरिषद संबंधित विभाग प्रमुख, प्रभारी आरोग्य निरीक्षक यांच्यासह यावल नगरपरिषद मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी न करता पुणे येथील दिशा एजन्सीला बिल अदा केल्याने अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

१४ वा आणि १५ वा वित्त आयोग अंतर्गत प्राप्त निधी डिसेंबर २०२३ करता कामापोटीचे देयक १४ लाख ६२ हजार ३८९ रुपये पुणे येथील दिशा एजन्सीला देण्याची कार्यवाही यावल नगर परिषदेने केल्याने जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणाची चौकशी आणि प्रत्यक्ष खात्री जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका शाखा, सहाय्यक आयुक्त व जिल्हाधिकारी जळगाव यांनी केल्यास यावल नगरपरिषदेने १४ वा आणि १५ व्या आयोगाच्या निधीची विल्हेवाट कशी लावली हे समोर आल्याशिवाय राहणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here