साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील हिवरखेडा रस्त्यावरील गोविंद महाराज संस्थानच्या क्रीडांगणावर भारतातील सर्वांत मोठी कुस्तीची दंगल रविवारी, ११ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे. कुस्त्यांच्या दंगलीला दुपारी एक वाजता सुरूवात होणार असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत दंगली रंगणार आहेत. जामनेरमध्ये देशातील अव्वल पैलवान येऊन ताकद आजमावणार आहेत. मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून जामनेर तालुकावासियांना कुस्त्यांची भव्य दिव्य दंगली पहावयास मिळणार आहेत. देशाच्या कान्या-कोपऱ्यातून अव्वल दर्जाचे आंतरराष्ट्रीय पहेलवान शहरात दाखल झाले आहेत. कुस्त्यांच्या दंगलसाठी हिवरखेडा रस्त्यावरील क्रीडांगण सज्ज झाले आहे. दंगल स्थळी प्रेक्षकांना बसून कुस्त्यांचा आनंद घेण्यासाठी आसनाची व्यवस्था केली आहे. भाजपच्यावतीने ‘नमो कुस्ती महाकुंभ’ असे नाव स्पर्धेला दिले आहे. तालुक्यांसह महाराष्ट्रातील युवक…
Author: Sharad Bhalerao
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून भुसावळ ते अकोला ही बस भुसावळहून मलकापूरला सकाळी सात वाजे दरम्यान येणारी एसटी बस वडनेर भोलजीला थांबा असतांनाही सर्व्हिस रस्त्याने येऊन प्रवासी न घेता थेट उड्डाणपूलावरुन निघून जात होती. तसेच दिवसभरात अजूनही काही बस उड्डाणपूलावरून निघून जात होत्या. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी मलकापुरच्या आगार प्रमुखांची भेट घेऊन थांब्यावर बस थांबविण्याची विनंती केली. तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आगार प्रमुखांना दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेतल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तूर्त टळले आहे. त्यामुळे शिक्षणाची सोय झाली असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत. मलकापूरचे बस आगार प्रमुख मुकुंद…
साईमत, भुसावळ : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि विचार बालमनावर रुजावेत, या हेतुने भुसावळ येथील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी जळगाव जिल्हास्तरीय महावक्तृत्व स्पर्धेचे रविवारी, २५ फेब्रुवारी रोजी आयोजन केले आहे. यंदा स्पर्धेचे सातवे वर्ष आहे. ही स्पर्धा पाच गटात होणार आहे. प्रत्येक गटातील तीन विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कमेसह स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येइल. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहन दिले जाणार आहे. ही स्पर्धा रविवारी, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:३० वाजता भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कुल, नहाटा कॉलेज शेजारी, जामनेर रोड येथे होणार आहे. स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी प्रकल्प प्रमुख देव सरकटे-८९८३६१०९१७, प्रकल्प समन्वयक समाधान जाधव…
साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर येथील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न देवासमोर मांडण्याचा प्रयत्न करत सपत्नीक महादेवाला अभिषेक करत कापसाला भाव मिळण्यासाठी साकडे घातले. महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी कापसाला भाव मिळत नसल्याने त्रस्त आहे. शासनाने घोषित केलेल्या हमी भावापेक्षाही कमी भावाने कापूस विक्री होत असल्याने गतवर्षी उत्पादित झालेला ४० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. यावर्षीही कापसाला प्रतिक्विंटल ६ हजार ५०० इतकाच भाव मिळत आहे. कापसाच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव कापसाला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्र शासनाकडे मागणी करत आहे. परंतु आपली सत्ता टिकविण्यात मग्न असलेल्या सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असे सद्यस्थितीला चित्र आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील पंचायत समितीत तालुक्यातील दिव्यांग बांधवांना माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते स्वयंचलित सायकलींचे वाटप नुकतेच करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग योजनेअंतर्गत तालुक्यातील तब्बल १७ दिव्यांग बांधवांना स्वयंचलित सायकलींचे मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, सेवानिवृत्त अभियंता जे.के.चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजमल भागवत, पंचायत समितीचे माजी सभापती नवलसिंग राजपूत, विस्तार अधिकारी अशोक पालवे, अमर पाटील, पवन माळी यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी तसेच दिव्यांग बांधव, नागरिक उपस्थित होते. केंद्र सरकारने देशातील सर्व अपंगांना ‘अपंग’ असे न संबोधता ‘दिव्यांग’…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचखेडा बु. येथील रहिवाशी तथा सामाजिक कार्यकर्ते कै. आत्माराम पाटील (आप्पा) यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ जळगावच्या रेड स्वस्तिक संघटनेच्या सहकार्याने नुकत्याच घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात मेंदू, मणका, बीपी, शुगर, नेत्रतपासणी तसेच उपचार करण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ४३० रुग्णांची आरोग्य तपासणी करुन ७९ रूग्णांची विविध शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. शिबिरात दरवर्षी चिंचखेडा ते शेगाव पायी वारीसाठी जाणाऱ्या भाविकांसह तालुक्यातील रुग्णांसाठी रेड स्वस्तिकच्या माध्यमातून कै. आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन रेड स्वस्तिकचे महाव्यवस्थापक तथा छत्रपती शिवाजी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष अशोक शिंदे, रेड स्वस्तिकचे मार्गदर्शक…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी येथील गुड शेपर्ड इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थांच्या एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात उद्याच्या भविष्याची चाहुल स्पष्टपणे दिसून येत होती. कार्यक्रमाला नर्सरी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मनोगतातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातील साचलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. प्रास्ताविकात दहावीच्या वर्गशिक्षिका भारती तिवारी यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचा प्रवास उलगडून दाखविला. त्यांनी केलेल्या खोड्या, मिळविलेले यश, याबद्दल माहिती देऊन त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी कुणाल चव्हाण, अंजली बडगुजर, सम्राट हरपे, तेजस्वी गावित, नम्रता गरुड, विनय पाटील, देवांग धनगर, धनश्री…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्फे श्री.गो.से.हायस्कुल येथील कलादालनात अमृत भारत स्टेशन योजनेमार्फत चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. पाचोरा शहरातील रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांमधील कलागुण मांडता यावे, आपले स्टेशन कसे असावे, अमृत भारत योजना, अशा विविध विषयांवर चित्रकला आणि निबंध स्पर्धा घेण्यात आली. अशा नाविन्यपूर्ण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका प्रमिला वाघ होत्या. स्पर्धेसाठी भुसावळच्या मुख्य कल्याण निरीक्षक विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या प्रमुख दीपा स्वामी यांनी विद्यार्थ्यांना योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपले रेल्वे स्थानक कसे असावे, अमृत भारत योजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पाचोरा शहरातील रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाची जबाबदारी…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांची शासनाच्या आदेशानुसार धुळे उपायुक्तपदी नुकतीच बदली केली आहे. याबद्दल त्यांचा शुक्रवारी, ९ फेबु्रवारी रोजी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून निरोप समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी त्यांचा नगरपालिकेत उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याधिकारी रवींद्र लांडे होते. चार वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विकासकामे केली. शहरातील बेशिस्त असलेल्या हातगाड्यांना शिस्त लावण्याचे काम त्यांनी केले. सत्काराला उत्तर देतांना मुख्याधिकारी बाविस्कर म्हणाल्या की, शहरातील स्वच्छता, आरोग्य आदी कामे करण्यास प्राधान्य दिले. नगरपरिषदेच्या सर्व अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी कामात नेहमी सहकार्य केले. त्याचप्रमाणे शहराचा विकास करण्यासाठी रस्ते, खुल्या जागा, पथदिवे आदी विकास कामे करण्याकरीता आमदार किशोर पाटील,…
साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर जामनेर तालुक्यातील एकुलती बु. येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादित करत एनएमएमएसच्या परीक्षेत पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएसची परीक्षा नुकतीच घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तीर्ण होऊन एकुलती गावात यशाचा तुरा रोवला आहे. एनएमएमएसच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये डिंपल दीपक कोळी -गुण १२९, प्रसाद गजानन कोळी-गुण ७६, दिव्या समाधान राऊत -गुण ७२, दीपाली किसन कोळी-गुण ६६ तर प्रीती दशरथ सुरवाडे- गुण ६९ यांचा समावेश…