धरणगावला गुड शेपर्ड स्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

0
1

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

येथील गुड शेपर्ड इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थांच्या एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात उद्याच्या भविष्याची चाहुल स्पष्टपणे दिसून येत होती. कार्यक्रमाला नर्सरी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मनोगतातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातील साचलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

प्रास्ताविकात दहावीच्या वर्गशिक्षिका भारती तिवारी यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचा प्रवास उलगडून दाखविला. त्यांनी केलेल्या खोड्या, मिळविलेले यश, याबद्दल माहिती देऊन त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी कुणाल चव्हाण, अंजली बडगुजर, सम्राट हरपे, तेजस्वी गावित, नम्रता गरुड, विनय पाटील, देवांग धनगर, धनश्री महाजन, सिध्दीका शिरसाठ, आयुषकुमार सैनी आदींनी मनोगत व्यक्त करून भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यामुळे अनेकांचे अश्रू अनावर झाले होते, तर काहींना शब्द सुचत नव्हते. आपल्या मोठ्या भावांबद्दल भावना व्यक्त करतांना आठवीच्या मेहुल कोठारीला अश्रू अनावर झाले होते. त्याचबरोबर २०२०-२१च्या बॅचमधून प्राजक्ता बाविस्कर, विधी गुप्ता, कल्याणी माळी, सनी चौटे यांनी मनोगत व्यक्त करतांना त्यांचे अनुभव सांगितले.

मार्गदर्शक शिक्षकांमधून प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांनी मार्गदर्शन केले. तसेच ज्येष्ठ शिक्षिका अनुराधा भावे, सपना पाटील, सुनिता भालेराव, गायत्री सोनवणे, शिरीन खाटीक, अमोल श्रीमावळे, लक्ष्मणराव पाटील आदींनी मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, परीक्षेचे नियोजन कसे असावे, स्पर्धेला सामोरे कसे जावे, यशस्वी व्यक्तीपेक्षा एक चांगला माणूस कसा व्हावा, याबाबत मत व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, रमिला गावित, स्वाती भावे, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजूका भदाणे, गायत्री सोनवणे, सुनिता भालेराव, पुष्पलता भदाणे, अमोल श्रीमावळे, लक्ष्मणराव पाटील, इंद्रसिंग पावरा, अमोल देशमुख, वैशाली पाटील, शितल सोनवणे तसेच विद्यार्थांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तथा आभार भारती तिवारी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here