चिंचखेडा बु.ला आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

0
2

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील चिंचखेडा बु. येथील रहिवाशी तथा सामाजिक कार्यकर्ते कै. आत्माराम पाटील (आप्पा) यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ जळगावच्या रेड स्वस्तिक संघटनेच्या सहकार्याने नुकत्याच घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात मेंदू, मणका, बीपी, शुगर, नेत्रतपासणी तसेच उपचार करण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ४३० रुग्णांची आरोग्य तपासणी करुन ७९ रूग्णांची विविध शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. शिबिरात दरवर्षी चिंचखेडा ते शेगाव पायी वारीसाठी जाणाऱ्या भाविकांसह तालुक्यातील रुग्णांसाठी रेड स्वस्तिकच्या माध्यमातून कै. आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन रेड स्वस्तिकचे महाव्यवस्थापक तथा छत्रपती शिवाजी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष अशोक शिंदे, रेड स्वस्तिकचे मार्गदर्शक भास्करराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रेड स्वस्तिकचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश झाल्टे, समन्वयक डॉ. धनंजय बेंद्रे, दिलीप गवळी, डॉ. गणेश पाटील, डॉ. प्रमोद अमोदकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते डी.एल. चौधरी, सुधीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिरात डॉ. स्वप्नील पाटील (न्यूरो सर्जन), डॉ. हर्षल पाटील (ह्दय रोग तज्ज्ञ), डॉ. तेजस राणे (फिजीशियन), डॉ. गोपाल घोलप (न्यूरोलॉजिस्ट), डॉ.चंदन चौधरी, अविनाश (नेत्र तपासणी) आदी डॉक्टरांच्या माध्यमातून सेवा देण्यात आली.

यशस्वीतेसाठी कैलास पाटील, पांडुरंग पाटील, डॉ. नंदलाल पाटील, डॉ.उमाकांत पाटील, डॉ.प्रशांत पाटील, अतुल पाटील, अरुण पाटील, दत्तू पाटील, नाना पाटील, भैय्या पाटील, दीपक पाटील, तुकाराम कोल्हे, निवृत्ती सोनवणे, बी.ओ.पाटील, सुरेश पाटील, भगवान पाटील, डॉ. शिवाजी पाटील यांच्यासह चिंचखेडा बु.च्या ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here